रेडीरेकनरच्या दरात पुणे जिल्हा अग्रेसर ; पुणे, पिंपरी चिंचवडसहा, 23 गावांसाठी इतकी झाली दर निश्चिती
नव्याने समाविष्ठ झालेल्या 23 गावांमध्येही दरवाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील झालेली विकास कामे, महत्त्वाचे प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प याबरोबरच पुण्यात सुरु होत असलेली मेट्रोसेवा , याबरोबच मागील दोन वर्षात जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार )याच्या आधारे ही दरवाढ करण्यात आली आहे.
पुणे- आजपासून राज्यात सर्वत्र रेडीरेकनरचे (RediRecner) नवीन दर लागू झाले आहे. याबाबत राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने काल ( गुरुवार) सांयकाळी याबाबतची घोषणा केली. नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रेडीरेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ पुणे जिल्ह्यात दिसून आली आहे. जिल्ह्यात एकूण 8.5 टक्के दरवाढ झाली आहे. यामध्ये पुणे , पिंपरी-चिंचवडसह , पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation)नव्याने समाविष्ठ झालेल्या 23 गावांमध्येही दरवाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील झालेली विकास कामे, महत्त्वाचे प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प याबरोबरच पुण्यात सुरु होत असलेली मेट्रोसेवा , याबरोबच मागील दोन वर्षात जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार (Property purchase and sale transactions)याच्या आधारे ही दरवाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरात व पीएमआरडीए क्षेत्रात घर घेणे अधिक महाग झाले आहे. नोंदणी विभागाने यावेळी पहिल्यांदाच महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी स्वतंत्र रेडीरेकनर दर ठरवले आहे.
पुण्यातल्या दारात घसरण
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुणे शहरात रेडीरेकनरच्या दराबाबत एकूण 935 झोन तयार केलेत त्यानुसार रेडी रेकनरचे दर ठरवले आहेत. यामध्ये नोंदणी विभागानं एकूण 99 झोनमध्ये रेडीरेकनर दरात घट केली आहे. तर 137 झोनमध्ये कोणत्याही प्रकारची दर वाढ न करता रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवले आहेत. शहारातील ज्या भागात कचऱ्याचे व्यवस्थापन, कत्तलखाना, स्मशानभूमी, एसटीपी प्लॅन्ट असलेल्या भागातील दरामध्ये घट करण्यात आली आहे. तर 137 झोनमधील दरामध्ये स्थिर ठेवण्यात आले आहेत.
या भागात 25 टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ
पुणे शहरातील आंबेगाव खुर्द हायवे लगतच्या निवासी झोन, आंबेगाव गावठाण, वडगाव खुर्द औद्योगिक झोन आणि फुरसुंगी गावठाण परिसरात तब्बल 25 टक्क्यांपेक्षा अधिक दर वाढ झाली आहे. पुणे शहर 6.12 टक्के वाढ झाली आहे. समाविष्ट 23 गावांत 10.15 टक्के, पिंपरी-चिंचवड शहरात 12.36 टक्के वाढ करण्यात आली आहे.
Nanded Murder | खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू
म्हशीनं ‘या’ जनावरांना शिकवला चांगलाच धडा! कर्माचं फळ मिळालं थेट 5Gच्या स्पीडनं..! Video viral