माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो, पुण्यातील डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन

पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर हे औषध कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो, पुण्यातील डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन
Dr Sarang Phadke
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 6:44 PM

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेला असून हा आकडा यापुढेही वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता पुण्यात मिनी लॉकडाऊन (Pune mini lockdown) लागू करण्यात आला आहे. पुण्यात लसीकरणावरही भर दिला जात आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर हे औषध कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा कोथरुड येथील डॉ. सारंग फडके यांनी केला आहे. (Pune Doctor Sarang Phadke claim about discovered a treatment for COVID-19 cure coronavirus)

डॉ. सारंग फडके यांनी कोरोनावर एका नावाने आयुर्वेदिक औषध तयार केलं आहे. या औषधामुळे कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय होत असल्याचा त्यांचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

आयुष मंत्रालयाकडे पाठपुरावा

आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिले असून, ते 100 टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा डॉ. फडके यांनी केला आहे.1 वर्षांच्या मुलापासून 78 वर्षांच्या पेंशटला हे औषध देण्यात आले आहे. या औषधाला मान्यता मिळावी म्हणून डॉ. फडके हे गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप केंद्राने त्यांची दखल घेतली नाही.

साईड इफेक्ट नसल्याचा दावा

हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असं डॉ. सारंग फडके यांचं म्हणणं आहे.

Pune Dr Sarang Phadke

डॉक्टर सारंग फडके यांनी हा दावा जरी केला असला, तरी कोणत्याही औषधाला सहजासहजी परवानगी मिळत नाही. कोरोनासारख्या जगभरात थैमान घालणाऱ्या आजारावर जगभरात औषध शोधले जात आहेत. हा संसर्ग पसरल्यानंतर जवळपास वर्षभराने भारतात लस उपलब्ध झाली. त्यामुळे डॉ. सारंग फडके यांच्या औषधाची वैद्यकीय पडताळणी किंवा तत्सम चाचण्या कशा होणार, कोण करणार हा प्रश्न आहे.

(टीप : वरील  माहिती ही डॉक्टर सारंग फडके यांनी केलेल्या दाव्याची आहे. कोणतंही औषध घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या)

संबंधित बातम्या 

Pune lockdown update : मोठी बातमी : पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद, उद्धव ठाकरे 5 मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

(Pune Doctor Sarang Phadke claim about discovered a treatment for COVID-19 coronavirus )

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.