पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली भीषण आग तीन तासांनी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Pune Fashion Street Market Fire Update)
रात्री 12 च्या सुमारास आग
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामं असल्याने ती आग पसरली.
Maharashtra: Fire breaks out at Fashion Street market in Camp area of Pune. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/EMepVu2TdE
— ANI (@ANI) March 26, 2021
या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. (Pune Fashion Street Market Fire Update)
सुदैवाने जीवितहानी नाही
या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Around 16 fire tenders & 2 water tankers are present here. At around 1:06 am, the fire was brought under control. Cooling operation on. 60 fire officials including 10 officers are at the spot: Prashant Ranpise, Chief Fire Officer of Pune Municipal Corporation
— ANI (@ANI) March 26, 2021
तब्बल तीन तासांनी आगीवर नियंत्रण
ही आग मध्यरात्री 1 च्या सुमारास पूर्णपणे आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आहे. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तर जवळपास 800 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. या आगीत व्यापाऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Pune Fashion Street Market Fire Update)
संबंधित बातम्या :