पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ एका रासायनिक कंपनीला लागेलल्या आगीत तब्बल 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली? आगीच्या दुर्घटनेला जबाबदार कोण? याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेला 24 तास उलटूनही मृतांच्या नातेवाईकांना उद्याप मृतदेह देण्यात आले नाहीत. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या कासवगती कारभारावर मृतांच्या नातेवाईकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आगीत मृत पावलेल्या कामगारांचे नातेवाईक मध्यरात्रीपासून ससून रुग्णालयात थांबून आहेत. पण रुग्णालयाकडून अद्याप त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नसल्याचं या नातेवाईकांनी म्हटलंय. (Pune Fire Crowd at Sassoon Hospital of relatives of dead workers)
उरवडेजवळच्या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपाच्या सुमारास घडली. त्यानंतर हे सर्व मृतदेह ससून रुग्णालयात आणण्यात आले आहेत. त्यानंतर मृतांच्या नातेवाईक मध्यरात्रीपासून रुग्णालयात थांबून आहेत. मृतदेहांची ओळख पडवण्याचं काम अद्याप बाकी आहे. मात्र, रुग्णालयात दाखल झालेल्या नातेवाईकांपैकी कुणाचाही डीएनए घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी जाण्यापेक्षा आमच्या भावना समजून घ्याव्यात, अशी प्रतिक्रिया नातेवाईक व्यक्त करत आहेत.
ळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळी आले होते. आगीत भस्मसात झालेल्या कंपनीची पाहणी केल्यानंतर वळसे-पाटील यांनी मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, रुपाली चाकणकर, संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वळसे-पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली.
मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीच्या दुर्घटनेत अनेक कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रत्यक्षदर्शींसोबत चर्चा केली. यावेळी खा. @supriya_sule देखील उपस्थित होत्या.#MulshiFire pic.twitter.com/TTWzmTHTaF
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) June 8, 2021
या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली. आगीचे कारण, त्याला जबाबदार कोण? हे निश्चित केलं जाईल. तसेच अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत. यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात, असं ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
Pune Fire | मुळशीच्या कारखान्यातील आग पुन्हा भडकली, गोदामातील साहित्याने घेतला पेट
Pune Fire Photo : पुण्यात सॅनिटायझर कंपनीत आग,15 महिलांसह 17 जणांचा मृत्यू
Pune Fire Crowd at Sassoon Hospital of relatives of dead workers