सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर शिवतारेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, पुण्यातील काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप

पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या उद्घाटनावरुन शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर शिवतारेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, पुण्यातील काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप
विजय शिवतारे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय जगताप
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 2:49 PM

पुणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे (Pratap Sarnaik Letter Bomb) खळबळ उडाली असतानाच शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Former Shivsena Minister Vijay Shivtare) यांनीही काँग्रेस आमदारावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात शिवतारेंनी गंभीर आरोप केले आहेत. विजय शिवतारे यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांच्यावर श्रेयवादाचा आरोप केला आहे. (Pune Former Shivsena Minister Vijay Shivtare writes to CM Uddhav Thackeray complaining about Purandar Congress MLA Sanjay Jagtap)

विजय शिवतारे यांच्या पत्रात काय?

पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या उद्घाटनावरुन विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यमंत्रिपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे. तोंडल येथे काम सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते” असा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.

या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल, अशी मागणीही विजय शिवतारे यांनी पत्रातून केली आहे.

शिवतारेंच्या मुलीचा आई-भावांवर आरोप

दरम्यान, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी दयनीय अवस्था केली आहे, असा आरोप विजय शिवतारे यांची कन्या आणि आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांच्या पत्नी ममता शिवतारे लांडे (Mamta Shivtare Lande) यांनी वडिलांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन गेल्याच आठवड्यात केला होता. त्यानंतर, विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे  यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत लेकीचे आरोप फेटाळले. मुलगी ममता यांनी मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत, असा दावा मंदाकिनी यांनी केला होता. मुळे शिवतारे कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

संबंधित बातम्या :

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; वाचा संपूर्ण पत्रं जसच्या तसं

शिवतारे 27 वर्षांपासून अलिप्त, एकीशी विवाहबद्ध, दुसरीसोबत पवईला राहतात, लेकीच्या आरोपांना आई मंदाकिनींचे उत्तर

संपत्तीसाठी भावांकडून वडील विजय शिवतारेंचा मानसिक छळ, कन्या ममता शिवदीप लांडेंच्या आरोपांनी खळबळ

(Pune Former Shivsena Minister Vijay Shivtare writes to CM Uddhav Thackeray complaining about Purandar Congress MLA Sanjay Jagtap)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.