P. N. Gadgil Jewellers | पुण्यात पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
चंडीगडमध्ये व्यवसाय सुरु करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे (Fraud With P. N. Gadgil Jewellers). राज्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला तब्बल 1 कोटी 60 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत (Fraud With P. N. Gadgil Jewellers).
चंडीगडमध्ये व्यवसाय सुरु करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गाडगीळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रोहितकुमार शर्मा (वय 59) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची शाखा चंडीगड येथे उघडण्यासाठी 50 कोटीचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवत रोहितकुमार शर्मा याने गाडगीळ यांच्या पुण्यातील कार्यालयात येऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करुन कर्ज वितरणासाठी आणि प्रक्रिया शुल्क म्हणून फिर्यादींकडून 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपये घेतले.
दरम्यान, पैसे देऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कर्जाची प्रक्रिया किंवा पैसे मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गाडगीळ यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.
पुण्यात तिशीतील तरुणाचा मृतदेह आढळला, ‘शिवप्रेमी’च्या टॅटूवरुन ओळख पटवण्याचे प्रयत्न https://t.co/D4468ZXyeI #Pune | #PuneCrimeNews | #Tattoo
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2021
Fraud With P. N. Gadgil Jewellers
संबंधित बातम्या :
‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’
आई-पप्पा माफ करा, फेसबुक पोस्ट लिहून पुण्यातील तरुणी आत्महत्येसाठी घराबाहेर, पुढे काय घडलं?