पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या समर्थकाने एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली तेव्हा मारणे चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ते पाहून घ्या.

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत, 'तो' व्हिडीओ आला समोर
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 6:27 PM

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गजानन मारणे याच्या एका समर्थकाने व्हिडीओ व्हायरल केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्याचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. मात्र परत एकदा गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण करणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

गजानन मारणे याच्या समर्थकाने नंबर प्लेट नसलेल्या मोठ्या आवाजाच्या गाड्या टोळक्याने फिरवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की गजानन मारणे या गांड्याची पुजा करत असून नारळ फोडताना दिसत आहे.  हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळाला आहे.

या व्हिडीओमुळे गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण केलं जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी सर्व गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालयात एकत्रित करून निर्बंध घालून देण्यात आले होते. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवल्याने एक प्रकारे आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ:-

पोलीस आयुक्त अमितेश कुमार पदभार स्वीकारल्यावर पुण्यातील 267 गुन्हेगारांना आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं. गुन्हेगारांची ओळख परेड सुरू असताना मीडियालाही लाईव्ह करण्याची परवानगी देत पोलिसांनी गुन्हेगारांना तंबी दिली. याआधी फक्त ज्या गुन्हेगारांची नावं ऐकलीत टोळीच्या म्होरक्यांना सर्वांनी पाहिलं. यामध्ये गजा मारणे, बंडू आंदेकर, निलेश घायवळ, बाब बोडकेसह इतरही टोळीच्या म्होरक्यांना ओळख परेडसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलेलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.