Pune crime : जागेवरून उठले नाहीत म्हणून बांबूनं मारहाण, गरम पाणीही ओतलं; अंडाभुर्जी चालकाच्या मारहाणीत पुण्यात कचरावेचकांचा मृत्यू

| Updated on: May 31, 2022 | 5:05 PM

एकूण चौघे जण त्याठिकाणी बसले होते. यावेळी आरोपीने त्यांना बांबूने मारले तसेच अंगावर गरम पाणी टाकले. त्यामुळे त्यातील दोघे गंभीर जखमी झाले. जबर मारहाणीमुळे चारपैकी दोघे पुरूष निपचीत पडून होते.

Pune crime : जागेवरून उठले नाहीत म्हणून बांबूनं मारहाण, गरम पाणीही ओतलं; अंडाभुर्जी चालकाच्या मारहाणीत पुण्यात कचरावेचकांचा मृत्यू
भंडाऱ्यात मावाच्या वादातून मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला
Image Credit source: tv9
Follow us on

सासवड, पुणे : कचरावेचकांना (Garbage collector) बांबूने मारहाण करत आणि अंगावर गरम पाणी फेकण्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला आहे. विश्रांतीसाठी हे कचरावेचक बसलेले असताना अंडाभुर्जीच्या टपरीवाल्या तरुणाने हा प्रकार केला आहे. सासवडच्या भोंगळे वाइन्सजवळ कट्ट्यावर ही घटना घडली. या प्रकारामुळे जखमी (Injured) झालेल्या कचरावेचकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका 50 वर्षे वयाच्या आणि दुसऱ्या 60 वर्षे वयाच्या पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या दोन्ही व्यक्तींची ओळख अद्याप झालेली नाही. तसेच त्यांचे नाव आणि पत्ता शोधण्याचे काम सुरू आहे. खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव निलेश उर्फ पप्पू जयवंत जगताप (रा. ताथेवाडी, सासवड) असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सासवड पोलीस ठाण्याचे (Saswad Police) सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल चिखले यांनी या प्रकरणी काल रात्री फिर्याद दिली. तर फिर्याद अंमलदार विनय झिंजुरके यांनी दाखल केली.

विश्रांतीसाठी बसले होते सावलीत

सहा पोलीस उपनिरीक्षक सुनिल चिखले यांनी दाखल फिर्यादीत म्हटले आहे, की सासवड (ता. पुरंदर) येथील भोंगळे वाइन्सलगतच्या कट्ट्यावर ही घटना ता. 23 रोजी दुपारच्या वेळी घडली. घटनास्थळाच्या बाजूस काम करणारे सुनिल रामचंद्र मुळीक यांनीही इतर साक्षीदारांसोबत याबाबत माहिती दिली. दुपारचे वेळेस कट्ट्यावर बसलेल्या कचरा गोळा करणाऱ्या लोकांना आरोपी पप्पू जगताप याने अगोदर हाकलण्याचा प्रयत्न केला. जगताप हा त्याठिकाणी अंडाभुर्जीची गाडी लावतो. त्याच ठिकाणी हे कचरा गोळा करणारे लोक बसलेले उठत नव्हते. त्यामुळे तो त्यांना मारहाण करून उठवत होता.

हे सुद्धा वाचा

आरोपीवर गुन्हा दाखल

एकूण चौघे जण त्याठिकाणी बसले होते. यावेळी आरोपीने त्यांना बांबूने मारले तसेच अंगावर गरम पाणी टाकले. त्यामुळे त्यातील दोघे गंभीर जखमी झाले. जबर मारहाणीमुळे चारपैकी दोघे पुरूष निपचीत पडून होते. त्यानंतर कोणीतरी कळविल्याने त्यांना रुग्णावाहिका येऊन घेवून गेली. मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तर इतर दोघे आणि घटनेचे साक्षीदार लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम आणि शेवंताबाई जाधव यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सासवड पोलिसांनी आरोपीवर भा. दं. वि. क. 302, 326नुसार दोनजणांच्या खुनाचा आणि इतरांना गंभीर दुखापत करण्याबाबतचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.