डेक्कनच्या सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर, गॅस गळतीच्या भीतीने परिसरात खळबळ

गरवारे कॉलेजजवळ असलेल्या सेंट्रल मॉलमध्ये केमिकलचा उग्र वास येत होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

डेक्कनच्या सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर, गॅस गळतीच्या भीतीने परिसरात खळबळ
पुण्यातील सेंट्रल मॉल परिसरात गॅस गळतीची शक्यता
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:25 PM

पुणे : डेक्कन परिसरातील सेंट्रल मॉल परिसरात गॅस गळतीच्या भीतीने एकच खळबळ उडाली होती. दुपारी 12 वाजता गरवारे कॉलेजजवळ असलेल्या सेंट्रल मॉलमध्ये केमिकलचा उग्र वास येत होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.(Gas leak in Central Mall in Deccan area of ​​Pune)

अग्निशमन दलाच्य जवानांनी पाहणी केली असता मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळून आली आहे. या केमिकल पावडरमुळे गॅस निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्किंगमधील ती पावडर बाहेर काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आली आहे. आता मॉलमध्ये ही पावडर कुठून आली याचा तपास केला जात आहे. एनसीएलचे अधिकारी हा तपास करणार आहेत. गॅस गळतीची शक्यता लक्षात घेता मॉल रिकामा करण्यात आला होता. त्यानंतर एरंडवणा अग्निशमन दलाच्य जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पुढील धोका टाळला.

फॅशन स्ट्रीटला भीषण आग, तब्बल 800 दुकानांची राख

पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी मध्यराक्षी भीषण आग लागली होती. तब्बल 800 दुकानं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झालं आहे.

इतर बातम्या : 

डोंगरावरुन दुर्बिणीतून प्रत्येक बॉलवर नजर, पुण्यात ‘टीव्हीपेक्षा तेज’ सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक

दुकानं बंद करण्यासाठी 1 तासांचा वेळ वाढवून द्या, पुणे व्यापारी असोसिएशनची मागणी

Gas leak in Central Mall in Deccan area of ​​Pune

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.