Video | केस वाळवायला छतावर गेली, पाय घसरताच कोसळली, मुलीला कसं वाचवलं ? पुण्यात शुक्रवारपेठेत थरार

केस वाळवायला इमारतीच्या छतावर गेलेली इयत्ता दहावीत शिकणारी एक मुलगी खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. नशिब बलवत्तर म्हणून खाली कोसळताना या मुलीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या ग्रीलला पकडले आणि तिचा जीव चाचला.

Video | केस वाळवायला छतावर गेली, पाय घसरताच कोसळली, मुलीला कसं वाचवलं ? पुण्यात शुक्रवारपेठेत थरार
PUNE GIRL
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 4:53 PM

पुणे : केस वाळवायला इमारतीच्या छतावर गेलेली इयत्ता दहावीत शिकणारी एक मुलगी खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. नशिब बलवत्तर म्हणून खाली कोसळताना या मुलीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या ग्रीलला पकडले आणि तिचा जीव वाचला. तिसऱ्या मजल्यावर जीव मुठीत घेऊन उभ्या राहिलेल्या या मुलीला नंतर रेस्क्यू करण्यात यश आले. पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऋतुजा जगदाळे असं मुलीचं नाव असून ती इयत्ता दहावीत शिकते. (Pune girl falls off from building terrace gets stuck in window grill rescued by fire brigade)

केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली

मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा जगदाळे ही पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये राहते. याच अपार्टमेंटमध्ये या मुलीचं घरं आहे. तिचे वडील इथं वॉचमनचं काम करतात. गेल्या सहा वर्षापासून ते या इमारतीत राहतात. मात्र, ऋतुजा जगदाळे या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत आज साकळी 9 वाजता एक धक्कादायक घटना घडली. ती केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली होती. टेरेसवरील ग्रीलला धरून ती उभी राहिली होती. मात्र तिला काही समजण्याच्या आतच तिचा पाय घसरला आणि ती तशीच खाली आली. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून खाली कोसळताना तिच्या हातात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ग्रील आली. या ग्रीलला तिने गच्च पकडलं.

पाहा व्हिडीओ :

मुलीला रेस्क्यू करण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण

त्यानंतर या मुलीला खाली उतरवण्यासाठी साडी टाकण्यात आली. पण तिला रेस्क्यू करण्यात अडचणी येत होत्या. या मुलीला रेस्क्यू करण्यासाठी नंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच जवानांनी या मुलीला सुखरुपणे खाली उतरवले.

मुलीने अचानकपणे रडायला सुरुवात केल्यानंतर वडिलांना घटना समजली 

दरम्यान, ऋतुजा जगदाळे जेव्हा खाली कोसळली तेव्हा तिचे वडील अंघोळीला गेले होते. ऋतुजा वर छतावर गेल्याची कल्पना त्यांना नव्हती. मात्र, मुलीने अचानकपणे रडायला सुरुवात केल्यानंतर ते गोंधळले. त्यानंतर ऋतुजाच्या वडिलांना सदर प्रकार समजला. ही माहिती तिच्या आईने दिली आहे. ऋतुजाला वाचवण्यात यश आल्यामुळे अपार्टमेंटमधील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. लोक अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

नाशिकमध्ये महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न, पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत खासदार संभाजीराजेंसमोर समन्वयकाचा गोंधळ, बोलू दिलं जात नसल्याचा आरोप

खोदकाम करताना पिंपरी शहराच्या मध्यवस्तीत बॉम्ब सापडला, धाकधूक वाढवणारा बॉम्ब नेमका कसा आहे?

(Pune girl falls off from building terrace gets stuck in window grill rescued by fire brigade)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.