VIDEO | पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न, 18 वर्षीय तरुणी ग्रीलमध्ये अडकली
पुणे जिल्ह्यातील एरंडवणे भागात बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला. (Pune Quarantine Centre window grill)
पुणे : क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणं पुण्यातील 18 वर्षीय तरुणीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर पडताना तरुणी गजामध्ये अडकली. अखेर ग्रील तोडून तिची सुटका करावी लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Pune Girl tried to flee away from Quarantine Centre stuck in window grill)
दिल्लीच्या तरुणीचा खिडकीतून पळण्याचा प्रयत्न
पुणे जिल्ह्यातील एरंडवणे भागात बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला. क्वारंटाईन सेंटरमध्ये संबंधित 18 वर्षीय तरुणीला ठेवले होते. ही तरुणी मूळ दिल्लीची असल्याची माहिती आहे. मात्र तिने खोलीच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
ग्रीलमध्ये अडकल्याने तरुणी अडकली
क्वारंटाईन सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या तरुणीने खिडकीच्या गजामधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ग्रीलमधून बाहेर पडण्याच्या नादात तरुणी त्यामध्ये अडकली. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
हायड्रॉलिक कटरने गज तोडले
एरंडवणे अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि जवानांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला, घाबरलेल्या तरुणीला धीर देण्यात आला. त्यानंतर हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने खिडकीचे गज तोडले गेले आणि संबंधित तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली. तरुणीला पुन्हा पुणे महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलं.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
क्वारंटाईन सेंटरला दिलेलं सामान परतलंच नाही; टीव्ही, 4 हजार गाद्या आणि 8 हजार बेड गायब
(Pune Girl tried to flee away from Quarantine Centre stuck in window grill)