पुणे ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल 80.54 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कोणत्या ग्रामपंचायतीत?
या निवडणुकीचा निकाल तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. (Pune Gram Panchayat Election 2021 Voting)
पुणे : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ अखेर आज संपली. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. यात पुणे जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींपैकी 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्याने उर्वरित 649 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकांसाठी तब्बल 80.54 टक्के मतदान झालं. (Pune Gram Panchayat Election 2021 Voting)
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 4904 जागांसाठी 11 हजार सात उमेदवार रिंगणात उभे होते. त्यासाठी आज (15 जानेवारी) मतदान प्रकिया पार पडली. या निवडणुकीत एकूण 13 लाख 88 हजार 314 मतदारांपैकी 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदान केले आहे.
यामध्ये 5 लाख 33 हजार 708 स्त्रियांचा समावेश आहे. तर 5 लाख 84 हजार 392 पुरुष मतदारांनी मतदान केले आहे. तर 4 इतरांचे मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
किरकोळ वाद वगळता संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान प्रकिया पार पडली. यंदाच्या निवडणुकीत ग्रामंपचायतीची संख्या अधिक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे.
?तालुका – एकूण ग्रामपंचायती – मतदानाची टक्केवारी
- वेल्हे 20 – 86.69
- भोर 63 – 85.53
- दौंड 49 – 79.30
- पुरंदर 55 – 82.95
- इंदापूर 57 – 81 .92
- बारामती 49 – 84.64
- जुन्नर 59 – 76.55
- आंबेगाव 25 – 76.91
- खेड 80 – 82.04
- शिरुर 62 – 82.77
- मावळ 49 – 81.76
- मुळशी 36 – 76.27
- हवेली 45 – 73.58
?एकूण 80.54
?एकूण मतदार – 13 लाख 88 हजार 314 ➡️स्त्री – 6 लाख 73 हजार 145 ➡️पुरुष- 7 लाख 15 हजार 148
?झालेले मतदान – 11 लाख 18 हजार 104 ➡️स्त्री – 5 लाख 33 हजार 708 ➡️पुरुष – 5 लाख 84 हजार 392
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. (Pune Gram Panchayat Election 2021 Voting)
संबंधित बातम्या :
ग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार, उमेदवाराचं स्वत:लाच मतदान नाही!
ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल