Pune crime : आईला का सांगतेस? थांब तुला सोडतच नाही म्हणत चाकूनं वार करत पत्नीचा खून, निर्दयी पतीला हडपसर पोलिसांनी केली अटक

दारूच्या नशेत हनुमंतने हे सर्व आईला का सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही, असे म्हणत पत्नीच्या छातीवर, पोटावर वार चाकूने सपासप करून तिचा खून केला.

Pune crime : आईला का सांगतेस? थांब तुला सोडतच नाही म्हणत चाकूनं वार करत पत्नीचा खून, निर्दयी पतीला हडपसर पोलिसांनी केली अटक
पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने आजीचा गळा चिरलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 8:25 PM

पुणे : पती मारहाण करतो, अशी सासूकडे तक्रार केल्याने पतीने पत्नीचा खून (Murder) केला आहे. साडेसतरानळी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती दारूच्या नशेत पट्ट्याने मारतो, अशी तक्रार सासूकडे केल्याच्या रागातून ही घटना घडली. पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. यावेळी मध्यस्ती करणाऱ्या मेव्हणीवरदेखील वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पत्नीचा खून करणाऱ्या पतीला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे. हनुमंत धोंडिबा पवार (वय 22, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. नंदिनी हनुमंत पवार (वय 19) यांही हत्या करण्यात आली आहे. तर मेव्हणी कोमल वैजनाथ लांडगे (वय 22, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) यांच्यावर वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

दारू पिऊन करायचा मारहाण

याप्रकरणी नंदिनी यांच्या आई माणिक शिवाजी कांबळे (वय 55, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि हनुमंत यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. या मुलीला सांभाळण्यासाठी नंदिनी यांची आई त्यांच्यासोबत राहतात. मोठी मेव्हणीही राहण्यास तेथेच आहे. हनुमंत बिगारी काम करतो. त्याला दारूचे व्यसनदेखील आहे. घरात नेहमीच वाद होत होते. दारू प्यायल्यानंतर तो पत्नीला मारहाण करत असायचा. घटनेच्या दिवशी हनुमंत याने नंदिनी यांना पट्ट्याने मारहाण केली होती. हा प्रकार त्यांनी आपल्या आईला सांगितला.

हे सुद्धा वाचा

मेव्हणीलाही केले जखमी

हनुमंत याला पत्नी नंदिनीचा राग आला. या रागातून दारूच्या नशेत हनुमंतने हे सर्व आईला का सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही, असे म्हणत पत्नीच्या छातीवर, पोटावर वार चाकूने सपासप करून तिचा खून केला. याच दरम्यान बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या कोमल यांच्यावरही हनुमंतने वार करून जखमी केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, निरीक्षक अरविंद गोकुळे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ पडवळकर करीत आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.