झिका विषाणूचा पुरंदरच्या बेलसरमध्ये राज्यातील पहिला रुग्ण, प्रशासन ॲलर्ट मोडवर, 10 टीमकडून सर्वेक्षण सुरु
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आल्याने त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
पुणे: जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आल्याने त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बेलसर येथील एका 50 वर्षीय महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात झिका विषाणू आढळलेली ही पहिलाच रुग्ण आहे.
मिश्र विषाणू संसर्ग
झिका विषाणूचा संसर्ग झालेली ही महिला चिकुन गुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच झिका या विषाणूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
10 टीमकडून सर्वेक्षण
राज्यस्तरीय शिघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावातील परिस्थितीची पाहणी केली. तशेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने गावात 10 टीम च्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आली आहे. याशिवाय फॉगिंग मशीन सहाय्याने धुरळणी करून पाणी साठवण्याच्या ड्रम मध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. झिका विषाणूने बाधित असलेली महिलेची तब्येत चांगली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्वला जाधव यांनी सांगितले आहे.
झिका विषाणूची लक्षणं कोणती?
झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.
झिकापासून वाचण्यासाठी काय करावं
झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट औषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
झिका व्हायरसवर लस किंवा उपचार नाही
सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.
इतर बातम्या:
झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला
कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?
Pune Health department alert afte first zika virus patient found in Pruandar Belsar ten team started survey