आमची स्वप्नं बेचिराख झाली…माझी एकुलती एक मुलगी गेली हो.. पित्याचा टाहो…अपघाताने दोन कुटुंबांच्या घरी मातम
पुण्यातील कल्याणीनगरात एका बेफाम कार चालकाच्या पोर्शे कारने उडविल्याने सॉफ्ट इंजिनिअर तरुण आणि तरुणींचा हकनाक बळी गेल्याची घटना शनिवार 18 मे रोजी रात्री उशीरा घडली. चालक हा अल्पवयीन असल्याने त्याला लागलीच न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने समाजात संतप्त भावना उमटल्या आहेत.
मध्य प्रदेशातील जबलपूरातील शक्तीनगराजवळील साकार हिल्स येथे युवा सॉफ्टवेअर इंजिनियर अश्विनी कोस्टा हीच्या घरी तिचे पार्थिव आले तेव्हा सोमवारी घरात तिचे वडील, भाऊ आणि नातेवाइकांचा आक्रोश पसरला. हे लोक धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांची मुलीने आपण पार्टीला जात आहोत असे फोनवरुन कळविले होते. त्यानंतर जो फोन आला तो तिचा अपघाताचा आला. त्यामुळे कुटुंबिय हादरुन गेले आहेत. आरोपी अल्पवयीन असला म्हणून काय झाले. अशा प्रकारची निबंध लिहायची शिक्षा पाचवीच्या मुलांना देतात. महाराष्ट्राचे पोलिस विकले गेले आहेत असा आरोप मृत्यू पावलेल्या अश्विनी आणि अनिसच्या पालकांनी केले आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर बेफाम वेगाने पोर्शे गाडी चालविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पल्सर बाईकला शनिवारी रात्री उडविल्याने दोघा इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कोर्टाने लागलीच रविवारी सुटीकालिन न्यायालयाने 15 तासांत जामिनावर सोडल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवार ( 17 ) मद्यपित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुणे पोलिसानी मुद्दामहून सदोष मनुष्यवधाचे कलमे लावले नसल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात आता टीका होत असल्याने पुणे पोलिसांनी बिल्डर अगरवाल यांनाही आरोपी करत अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरातून आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
घरात मातम पसरला
या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघा तरुणांच्या मृतदेहाची अवस्था पाहून कोणालाही या प्रकरणात अन्याय झाल्याचे पटेल अशी विचलित करणारी दृश्ये काही दिवसांपासून सोशल मिडीयावर फिरत आहेत. पोलिसांची या प्रकरणातील ढीली कारवाई आणि आरोपीला जामीनासाठी दिलेल्या पोरकट अटी पाहून पीडीत कुटुंबिय आणखीनच दु:खात बुडाली आहे. युवा सॉफ्टवेअर इंजिनियर अश्विनी कोस्टा हिच्या मध्य प्रदेशातील घरात तिचे पार्थिव सोमवारी सायंकाळी आल्यानंतर येथे अक्षरश: मातम पसरला. अश्विनीचे वडील सुरेश कोस्टा यांची अवस्था बिकट झाली आहे. ते म्हणाले की मुलगी शिक्षणासाठी पुण्याला गेली होती. तेथेच जॉब लागला होता. आणि तेथेच रहायला तिने सुरुवात केली. ती डिसेंबरमध्ये तेथे गेली होती. आता आमची सगळी स्वप्न उद्धवस्थ झाली आहेत असे तिचे वडील सुरेश कोस्टा यांनी सांगितले.
अपघाताआधी तिचा फोन आला होता
अश्विनीचा भाऊ संप्रीत यांनी सांगितले की त्याची बहीणीने पुण्यातून शिक्षण घेतले आणि चार महिन्यांपूर्वी जॉबसाठी पुन्हा शिफ्ट झाली. ती अभ्यासात खूपच हुशार होती. माझी लहान बहिण होती. आता मी एकटा पडलोय. ती माझ्या वडीलांशी रोजच बोलायची. तिने फोनवर सांगितले होते की जेवणासाठी बाहेर जात आहे पार्टी आहे. त्यानंतर ही बातमी आली. तिच्या मित्रांनी अपघातानंतर फोन केला होता. एक अल्पवयीन मुलगा गाडी चालवित होता. ती इतकी महागडी कार, त्या गाडीचा इतका वेग होता की ती दिसली देखील नाही. अशा प्रकारे सुविधांचा दुरुपयोद कोणत्याच प्रकरणात होऊ नये. म्हणून तरी कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा संप्रीत याने व्यक्त केली आहे.
मानवीबॉम्बचा प्रकार
अनिसच्या काकांनी पोलिसांचा कारवाईवर प्रश्नचिन्ह केले आहे. अनिस याचे वडील अखिलेश अवधिया यांनी सांगितले की ही वास्तविक सदोष मनुष्यवधाची 304 A ची केस आहे. आरोपीच्या जामीनाची अट हास्यास्पद आहे. नवीन कायद्यानूसार सात वर्षांची शिक्षा आहे. महाराष्ट्राची पोलिस विकली गेलेली आहे. कलम 304 अंतर्गत कारवाई व्हायला हवी. ही दोन सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या आहे. अल्पवयीन म्हणून आरोपीला सोडून दिले आहे. सामान्य माणूस असताना तर पोलिसांनी सोडले नसते. हा बिझनेसमनचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला सोडले आहे. अल्पवयीन मुलाच्या हाती अशी गाडी देणे म्हणजे मानवी बॉम्बच आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.