एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर

तुम्हालाही रॉयल एन्फिल्ड बुलेट जिंकण्याची इच्छा असेल आणि तुम्ही हार्डकोर नॉनव्हेज प्रेमी असाल, तर शिवराज हॉटेल तुमच्यासाठी खास योजना घेऊन आलं आहे (Pune Hotel Thali Bullet)

एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 2:09 PM

पुणे : हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स आपल्यासाठी नवीन नाहीत. दहा-वीस टक्के सवलतीपासून ‘एकावर एक फ्री’ अशा एकापेक्षा एक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. मात्र पुण्यातील एका रेस्टॉरंटने चक्क बुलेट जिंकण्याचं स्वप्न दाखवलं आहे. विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने दिली आहे. (Pune Hotel offers to finish 4KG Thali and win Royal Enfield Bullet)

एक लाख 65 हजारांची बुलेट बक्षीस

तुम्हालाही रॉयल एन्फिल्ड बुलेट जिंकण्याची इच्छा असेल आणि तुम्ही हार्डकोर नॉनव्हेज प्रेमी असाल, तर शिवराज हॉटेल तुमच्यासाठी खास योजना घेऊन आलं आहे. या हॉटेलमध्ये मिळणारी अतिभव्य ‘बुलेट थाळी’ तुम्ही 60 मिनिटांत संपवू शकलात, तर घरी जाताना तुम्ही बुलेटवर बसून जाल. कारण 1 लाख 65 हजार रुपयांची बुलेट तुम्हाला बक्षीस स्वरुपात मिळणार आहे. एका थाळीची किंमत 4444 रुपये आहे.

बुलेट थाळीमध्ये काय काय मिळणार?

शिवराजमध्ये मिळणारी बुलेट थाळी ही मांसाहारींसाठी पर्वणी आहे. या थाळीत दोन-चार नव्हे, तर तब्बल बारा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी चार किलो मटण आणि तळलेले मासे वापरले जातात. विशेष म्हणजे 55 जण ही थाळी तयार करण्यासाठी कार्यरत असतात.

सुरमई फ्राय पापलेट फ्राय चिकन तंदूरी मटण सुके मटण मसाला चिकन मसाला कोलंबी बिर्याणी

ग्राहकांचा ओघ वाढला

बुलेट थाळीची ऑफर सुरु केल्यापासून हॉटेलला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं अतुल वाईकरांनी सांगितलं. ही थाळी चाखून बघण्यासाठी आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांचा राबता वाढला आहे. दररोज जवळपास 65 बुलेट थाळींची विक्री होत असल्याची माहिती वाईकरांनी दिली. स्पर्धा घेताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत असल्याचं त्यांनी सांगितलं. (Pune Hotel offers to finish 4KG Thali and win Royal Enfield Bullet)

सोलापूरचा पठ्ठ्या स्पर्धेचा विजेता

सोलापूरमध्ये राहणारे सोमनाथ पवार बुलेट थाळी स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. त्यांनी चार किलो वजनाची थाळी एका तासाच्या आत गट्टम केली आणि बुलेट जिंकली. शिवराज हॉटेलमध्ये सहा प्रकारच्या भव्य थाळ्यांची विक्री होती. स्पेशल रावण थाळी, बुलेट थाळी, मालवणी फिश थाळी, पहलवान मटण थाळी, बकासूर चिकन थाळी आणि सरकार मटण थाळी या सहा थाळ्या तुम्हाला इथे चाखायला मिळतील. प्रत्येक थाळीची किंमत वेगवेगळी आहे.

शिवराज हॉटेलमध्ये आगळ्यावेगळ्या ऑफर्स

पुण्याजवळच्या वडगाव मावळमध्ये अतुल वाईकर यांनी आठ वर्षांपूर्वी शिवराज हॉटेल सुरु केले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एखादी आगळीवेगळी ऑफर ठेवण्याचं त्यांच्या डोक्यात होतं. अचानकच त्यांना बुलेटचं बक्षीस ठेवून ग्राहकांना रेस्टॉरंटकडे खेचून आणण्याची नामी कल्पना सुचली. हॉटेलच्या वरांड्यात वाईकर यांनी पाच शानदार रॉयल एन्फिल्ड बुलेट्स ठेवल्या आहेत. हॉटेलबाहेरील बॅनर, मेन्यूकार्ड अशा सर्वच ठिकाणी बुलेट थाळी स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी आठ किलोची रावण थाळी चौघांनी 60 मिनिटात संपवण्याचं आव्हान शिवराज हॉटेलमध्ये होतं. विजेत्याला पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार होतंच, शिवाय विजेत्यांना थाळीसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नव्हता.

(टीप : शिवराज हॉटेलमधील ऑफर सातत्याने बदलत असून अधिक माहितीसाठी फेसबुक, फोनच्या माध्यमातून संपर्क करा)

Posted by Atul Waikar on Wednesday, 4 November 2020

संबंधित बातम्या :

बुलेटप्रेमींसाठी मोठी बातमी, किमती बदलल्या, बुलेट स्वस्त की महाग?

(Pune Hotel offers to finish 4KG Thali and win Royal Enfield Bullet)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.