पुणे : राज्यातील वातावरणात एप्रिल महिन्यात मोठा बदल होत आहे. कधी तापमान ४० अंशावरपर्यंत जात आहे तर कधी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. एकीकडे सूर्यदेव कोपलेला असल्यामुळे राज्यात उकाडा प्रचंड वाढला आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना १३ व १४ एप्रिल रोजी यलो अलर्ट दिला आहे.
12 april,
Warnings are issued by IMD for next 5 days in Maharashtra. Thunderstorm with accompanied with lightning, gusty winds & hail at isolated places in parts of Madhya Mah on day 2 & 3.@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/JKvi75s4Bj हे सुद्धा वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 12, 2023
नवीन अंदाज काय
महाराष्ट्रात आठवडाभरापासून वातावरण मोठे बदल झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी अक्षरशः रेकॉर्डब्रेक तापमान एप्रिल महिन्यात झाले होते. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांना बसू लागलाय. बुधवारी रात्री मुंबईत विजेच्या कडकडांसहीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच मुंबईत तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत सध्या तापमान ३१ डीग्री सेल्सियसवर पोहचलंय तर हवेतील आर्द्रता ४१ वर नोंद झाली आहे.
या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा
हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा दिला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, नागपूर आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढणारी माहिती जाहीर केली आहे. यामध्ये राज्यात दिवस काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाल्याने वातावरणात उष्णता कायम राहणार आहे. विदर्भात पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. आणि ते तापमान 43 अंशापर्यन्त जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
हे ही वाचा
शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता, IMD ने स्कायमेटचा अंदाज खोडला, यंदा मॉन्सून कसा असेल वाचा