दुकान फोडून कॅडबरीचे चार बॉक्स लंपास, पुण्यातील चॉकलेट चोराची चांगलीच चर्चा
चोराने तब्बल सात हजार रुपये किमतीच्या डेरीमिल्क कॅडबरी चॉकलेटचे चार बॉक्स चोरुन नेले आहेत. (Pune Indapur Cadbury Chocolate Theft)
इंदापूर : इंदापूर शहरात चोरट्यांनी चक्क चॉकलेटवर डल्ला मारला. मेडिकल आणि जनरल स्टोअर असलेल्या दुकानातून चोरट्यांनी रोख रक्कम तर लुबाडलीच, मात्र डेअरी मिल्क कॅडबरी चॉकलेटचे चार बॉक्सही लंपास केल्याने इंदापूर शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. (Pune Indapur General Stores Cadbury Chocolate Box Theft)
इंदापूर शहरात वर्दळीच्या ठिकाणी असलेली शिक्षक सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. संपदा मेडिकल अँड जनरल स्टोअर्समध्ये बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरी केली. या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला होता. यात चोरट्यांच्या हाती सहा हजार आठशे रुपयांची रोख रक्कम लागली.
कॅडबरी चॉकलेटचे चार बॉक्स चोरीला
विशेष म्हणजे चोराने तब्बल सात हजार रुपये किमतीच्या डेरीमिल्क कॅडबरी चॉकलेटचे चार बॉक्स चोरुन नेले आहेत. गुरुवारी सकाळी मालक दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या संदर्भात इंदापूर पोलिस स्थानकामध्ये संपदा मेडिकल अँड जनरल स्टोअरचे मालक विकास भोसले यांनी तक्रार दिली आहे. अज्ञातांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चॉकलेट चोरीची पहिलीच घटना
इंदापूर शहरात चोराने कॅडबरी चॉकलेट चोरी करण्याची पहिलीच अशी घटना असून चोर अल्पवयीन तर नाही ना? अशी चर्चा सध्या शहरात रंगत आहे. पोलिस स्टेशनपासून हाकेच्या आंतरावर असलेल्या या भागात अशी चोरी झाल्याने शहरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उत्तर प्रदेशात चड्डी चोर
घराबाहेर वाळत घातलेल्या महिला अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चोरांना नुकत्याच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. फहीम अब्बासी आणि आशिक अली यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मेरठ पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारवाई केली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे कपडे हस्तगत केले आहेत. वाईट हेतूनेच आपण महिलांची अंतर्वस्त्र चोरल्याची कबुली चोरांनी दिली आहे. तंत्र मंत्र विद्या किंवा अंधश्रद्धेतून अंतर्वस्त्रांची चोरी होत असल्याची शंका सुरुवातीला व्यक्त केली जात होती. आधी पोलिसांनी फहीम अब्बासीची धरपकड केली. तर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आशिक अलीला बेड्या ठोकल्या.
संबंधित बातम्या :
हो, ‘त्या’ हेतूनेच महिला अंतर्वस्त्रांची चोरी, दोघा चोरट्यांची धक्कादायक कबुली
(Pune Indapur General Stores Cadbury Chocolate Box Theft)