रुग्णांना प्राणवायूची भेट, मुलाकडून वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा

| Updated on: May 01, 2021 | 3:00 PM

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मुलाने ग्रामीण रुग्णालयात 11 ऑक्सिजन सिलेंडर भेट देऊन आदर्शवत काम केलं आहे. Aniket Wagh donate oxygen cylinders

रुग्णांना प्राणवायूची भेट, मुलाकडून वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा
अनिकेत वाघ, नगरसेवक
Follow us on

पुणे: वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मुलाने ग्रामीण रुग्णालयात 11 ऑक्सिजन सिलेंडर भेट देऊन आदर्शवत काम केलं आहे. इंदापूर मधील नगरसेवक अनिकेत वाघ यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हा अनोखा उपक्रम पार पाडला. इंदापूर परिसरात अनिकेत वाघ यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. अनिकेत वाघ यांनी ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलीय. (Pune Indapur Municipal Council Member Aniket Wagh donate eleven oxygen cylinders to Nimgaon Ketaki Rural Hospital)

इंदापूरच्या निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाला सिलेंडर भेट

महाराष्ट्रासह देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे जाणवू लागलेला आहे, ही गंभीर बाब लक्षात घेता इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती अनिकेत वाघ यांनी त्यांचे वडील अरविंद विष्णू वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयाला अकरा ऑक्सीजन सिलेंडर भेट देऊन एक अनोखा उपक्रम केला आहे.

दानशूर व्यक्तींच्या योगदानाची गरज

कोरोनाच्या या महामारी मध्ये दिवसेंदिवस शहरी व ग्रामीण भागात रुग्ण वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागत आहे. अनिकेत वाघ यांनी त्यांच्या कार्यातून इतर तरुण राजकारण्यांसमोर आदर्श ठेवला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशाच पद्धतीने पुढे येऊन या कोरोना च्या काळात मदत केली तर नक्कीच आपण या कोरोनावर मात करू शकतो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे 6 लाख 62 हजार रुग्ण

राज्यात शुक्रवारी 62,919 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, राज्यात एकूण 6,62,640 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 46,02,472 झालीय. विशेष म्हणजे 69,710 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 38,68,976 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.06 % एवढे झालेय.

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray speech highlights : 12 कोटी डोस एकरकमी घेतो, पण लस पुरवा : मुख्यमंत्री

गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास दुष्परिणाम, अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर टाळाः मुख्यमंत्री

(Pune Indapur Municipal Council Member Aniket Wagh donate eleven oxygen cylinders to Nimgaon Ketaki Rural Hospital)