सोनाई डेअरीच्या प्रविण माने यांचा पाठिंबा कुणाला?; पत्रकार परिषद घेत म्हणाले…

Indapur Sonai Dairy Owner Pravin Mane on Baramati Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. अशात बारामती लोकसभा मतदारसंघातही घडामोडींनाही वेग आला आहे. प्रविण माने यांचा पाठिंबा कुणाला?; वाचा सविस्तर...

सोनाई डेअरीच्या प्रविण माने यांचा पाठिंबा कुणाला?; पत्रकार परिषद घेत म्हणाले...
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 12:10 PM

इंदापूर आणि परिसरात जनाधार असणाऱ्या सोनाई डेअरीच्या प्रविण माने यांचा पाठिंबा कुणाला? याची राजकीय वर्तुळात होत होती. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. आपण अजित पवारांसोबत असल्याचं माने यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात धुमसचक्री सुरू आहे. माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत राहिलं आहे. राज्यात अनेक बदल झालेत. अजित पवारांचे हात बळकट करुन त्यांची ताकद वाढवण्यासाठी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आजित पवारांसोबत आहोत, असं प्रविण माने म्हणाले.

प्रविण माने यांची भूमिका काय?

राज्याच्या विकासासाठी अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. आता प्रचार सुरू होणार आहे. आजपासून आम्ही प्रचार सुरू करणार आहोत. 8 दिवसापूर्वी लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. सुनेत्रा वहिनीचं मोठं सामाजिक काम राहिलेलं आहे. पण वहिनी कधी प्रकाशझोतात आलेल्या नाहीत. आता मात्र त्या राजकारणत आलेल्या आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं प्रविण माने म्हणाले.

अजित पवारांचं कौतुक

अजित पवार म्हणजे खमके नेते आहेत. ते सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतात. शब्दाला पक्के असे दादा आहेत. बारामतीनंतर इंदापूर तालुक्यात कामं सुरू आहेत. दादा इंदापुरात आले होते. काही व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं होतं. विकास कामे अजित दादाच करू शकतात. म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे, की दशरथ माने असतील आणि इतर कुटुंबिय अजितदादांच्या पाठिशी उभं राहणार आहे, असं प्रविण माने म्हणाले.

प्रविण मानेंचा पाठिंबा कुणाला?

आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही अजून ही पवार कुटुंबासोबत आहोत. अजित पवार हे विकास पुरुष आहेत. त्यामुळे आम्ही अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रियाताईंनी पण या मतदारसंघात काम केलेली आहेत. मात्र जास्त काम ही अजित पवारांनी केली आहेत. आम्ही आतून शरद पवारांना मदत करणार या चर्चेत तथ्य नाही. सुनेत्रा वाहिनीचा आम्ही प्रचार करणार आहोत. दशरथ माने आज नव्हते. पण त्यांनीच मला पत्रकार परिषद घेवून काय बोलायचं हे सांगितलं, असं प्रविण माने म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.