Positive Story | पुण्यात एकाच कुटुंबातील 21 जणांनी कोरोनाला परतवलं, बाळापासून आजीपर्यंत सर्व ठणठणीत

जगताप कुटुंबामधील लहानांपासून वृद्धांपर्यंत तब्बल 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Pune Jagtap Family 21 members defeated Corona)

Positive Story | पुण्यात एकाच कुटुंबातील 21 जणांनी कोरोनाला परतवलं, बाळापासून आजीपर्यंत सर्व ठणठणीत
पुण्यातील जगताप कुटुंबाची कोरोनावर मात
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 3:28 PM

पिंपरी चिंचवड : पुण्यात एकाच कुटुंबातील तब्बल 21 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र वैद्यकीय उपचार आणि इच्छाशक्तीच्या बळावर कुटुंबातील सर्वांनीच कोरोनाला धोबीपछाड दिली. विशेष म्हणजे सहा महिन्यांच्या बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील सदस्यांचा यात समावेश होता. मात्र कोरोनाला परतवून लावण्यास जगताप कुटुंबाने यश मिळवलं आहे. (Pune Jagtap Family 21 members defeated Corona)

पुणे जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट पाहायला मिळत आहेत. काही कोरोना बाधित रुग्ण खचून जाऊन त्यांचा मृत्यू झालेला पाहायला मिळत आहे. मात्र त्याला अपवाद पाहायला मिळत आहे ते पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबीय.

सहा महिन्यांच्या बाळालाही कोरोना

जगताप कुटुंबामधील लहानांपासून वृद्धांपर्यंत तब्बल 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगताप कुटुंबीयांमध्ये अगदी सहा महिन्यांच्या बाळाला देखील कोरोनाची लागण झाली होती. प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्य याच्या जोरावर या कुटुंबाने कोरोनावर मात केली आहे.

शेतकरी मुलाला आधी लागण

मांडवगण फराटा येथील शेतकरी अशोक जगताप यांनी आपल्या शेतामध्ये खरबुजाचे पीक घेतले होते. त्याची विक्री करण्यासाठी अशोक जगताप हे सतत बाहेरगावी जात असल्यामुळे त्यांचा संपर्क अनेकांशी येत होता. त्यामुळे पहिल्यांदा अशोक जगताप यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.

घरातील 21 जणं कोरोना पॉझिटिव्ह

तात्काळ अशोक जगताप यांनी स्वतःला विलग करुन घेत घरातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करुन घेतली. तर त्यामध्ये आई, वडील, चुलते, चुलती, भाऊ-भावजय, पुतणे, मुलं अशी तब्बल 21 जणं कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अशोक यांना मोठा धक्काच बसला. मात्र सर्वांनी वेळीच उपचार करुन घेण्याचे ठरवले.

सहा जणांवर रुग्णालयीन उपचार

घरातील 5 सदस्य हे मांडवगण फराटा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत होते, तर एका सदस्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, तर बाकी 15 सदस्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेतले. त्यामुळे जगताप कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींपासून ते लहान मुलांनी आपली इच्छाशक्ती आणि जिद्द याच्या जोरावर कोरोनाला हरवण्यामध्ये यश मिळवले आहे.

संबंधित बातम्या :

आतापर्यंत 4 वेळा कोरोना पॉझिटिव्ह, एकदा ऑक्सिजनचीही गरज, आता प्लाझ्मा देऊन वाचवतोय लोकांचा जीव!

(Pune Jagtap Family 21 members defeated Corona)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.