…त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही; जयंत पाटील काय म्हणाले?

Jayant Patil on Mahavikas Aghadi Space Allocation Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप कधी?; जयंत पाटील काय म्हणाले? पुण्यात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वाचं विधान केलं आहे. जयंत पाटील काय म्हणाले? वाचा...

...त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही; जयंत पाटील काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 3:57 PM

अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 10 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. कोणता पक्ष कुठून निवडणूक लढणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका होत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचं जागावाटप कधी होणार यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यत्र जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार? लोकसभेसाठी उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी?

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार? असा प्रश्न जयंत पाटील यांनी पत्रकारांनी पुण्यात विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. वंचितला सोबत घेण्यावरही ते बोलले आहेत. आमची यादी तयार आहे. काहीही अडचण नाही. चर्चा चांगली झाली आहे. प्रस्ताव घेतलाय त्यांनी त्याच्या कार्यकारणी समोर मांडला आहे. जागावाटपाबाबत वंचितशी पूर्ण झाल्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु आहे. ते आमच्यासोबत येतील असा विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

राज ठाकरेंच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर

शरद पवार देशात राज्यात राजकारण केलं. जनतेच्या मनातील लोकांना घेतात. निवडणूक जिंकणाऱ्या निवडून आणून मोळी बांधतात. ज्यांना मोळी बांधता आली नाही त्याच्यावर काय बोलणार?, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. भाजपकडून या लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला जातो. त्यावर जयंत पाटलांनी उत्तर दिलं. भाजपला 400 पार त्यांना करायचं आहे. त्या नेत्यांना पुढचं दिसत असेल. म्हणून असं विधान केलं जातंय, असं जयंत पाटील म्हणाले.

“आयुक्त सरकारचं काम करतात, पक्षाचं नाही”

महापालिका आणि सरकार यांची चूक आहे. खासदार आमदारांचं नाव टाकायला हवी. विरोधक असतील तरीही नाव द्यायला हवं. पुणे महापालिका आयुक्त आणि सरकारची चाकरी करतात. कोणा करत पक्षाची नाही. त्यामुळं असं करू नये, असंही जयंत पाटील म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.