पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ‘ड्रग्स’ कनेक्शन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील अपघात प्रकरणाचा ‘ड्रग्ज’ अँगलवरूनही तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनीही या प्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास सुरू केला आहे. शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या पार्टीत आरोपीने मित्रांसोबत दारूसह अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे. 18 मेला रात्री उशीरा पुण्यात भीषण अपघात झाला. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचं निधन झालं. यावरून वातावरण पेटलेलं आहे. आता या अपघाताच्या चौकशीला वेग आला आहे.
वेदांत अग्रवाल याच्यासोबत त्याचे आणखी दोन अल्पवयीन मित्र होते, अशी माहिती आहे. पालकांसह मुलांची चौकशी होणार आहे. त्यातील एक मित्र दिल्लीचा आहे. दिल्लीच्या मित्राला पोलिसांनी चौकशीला बोलवलं आहे. दिल्लीवरुन येताना पालकांना सोबत घेवून ये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. पुढील दोन दिवसात आता मित्रांच्या चौकशीचा धडका सुरु होणार आहे.
विशाल अग्रवालला पण पोलीस आयुक्तालयात आणलं. विशाल अग्रवालची पण चौकशी झाली आहे. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. तर ड्रायव्हरला पण ताब्यात घेतलं आहे. जबाबात एकसूत्रता आहे का? हे पाहण्यासाठी तिघांची एकच दिवशी चौकशी केली जात आहे. विशाल अग्रवालची सामाजिक सुरक्षा विभागात तर सुरेंद्र अग्रवाल हा गुन्हे शाखेत चौकशी करण्यात आली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि बार चालक जितेश शेवनी, जयेश बोनकर या तिघांना कोर्टाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. त्यानंतर आता या चौकशीला वेग आला आहे.
पुणे अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई सुरु केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात एकूण 32 परवाने रद्द केले आहेत. ज्यामध्ये 10 रुपटॉप हॉटेल, 16 पब आणि 6 बारचा समावेश आहे. शिवाय 297 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.