“पुण्यातील कसब्याने खोटेपणाला नाकारलं”; पोटनिवडणुकीच्या विजयामुळं राष्ट्रवादीनं भाजपला खोटं ठरवलं…
या सगळ्या प्रकारामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी मराठी माणसानी पैशाला नाकारला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणेः पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीवरून आता राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून आता भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या विजयाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कसबा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांचे अभिनंदन करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पोटनिवडणुकीच्या विजयाच्या निमित्ताने भाजपला लोकांनी नाकारले असल्याचे सांगत मराठी माणूस पैशात विकला जात नसल्याचे सांगत. पैसे वाटल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवर झाला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत यशस्वी झालेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे मूळचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत ही आणखी एक आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. धंगेकर कुटुंब हे मूळचे नाथाची वाडी, ता. दौंड येथील आहे. https://t.co/h0nomBtkYM
— Supriya Sule (@supriya_sule) March 2, 2023
तर कसबा पोटनिवडणुकीच्या विजयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, राजकीय पक्षापेक्षा हा येथील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय हे कसब्यातील कार्यकर्त्यांना जाते असंही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावताना आणि भाजपची निवडणुकीतील पैसे वाटपाच्या संस्कृतीवर निशाणा ठेवताना त्या म्हणाल्या पुण्यातील कसब्याने खोटेपणाला नाकारलं आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, कसब्यातील एक सीट सौ के बराबर आहे असं म्हणून त्यांनी कसब्यातील जागेच महत्वही अधोरेखित केले आहे. साम,दाम ,दंड भेद सगळं वापरून बघितलं मात्र विजय कार्यकर्त्यांचा झाला असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांनी हा विजय फक्त कार्यकर्त्यांमुळे मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी पोटनिवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मतदानादिवशीच पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पैसा वाटत असताना एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.
या सगळ्या प्रकारामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी मराठी माणसानी पैशाला नाकारला असल्याचेही त्यांनी सांगितले.