चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील, धंगेकर यांची खोचक टीका

| Updated on: Apr 13, 2023 | 4:10 PM

पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत हू इज धंगेकर असा प्रश्न विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद पुन्हा पेटलाय. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमदार धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी पुण्यातील पाहुणे चंद्रकांत पाटील यांना म्हटलंय.

चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील, धंगेकर यांची खोचक टीका
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे : कसबा पेठेचे (Kasba Peth) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) सध्या चर्चेत आहेत. भाजप उमेदवाराचा केलेल्या पराभवामुळे त्यांची चर्चा राज्यभर झाली. पुणे शहरात त्यांनी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करणे सुरु केले आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत हू इज धंगेकर असा प्रश्न विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं प्रत्यक्ष नाव न घेता तयार केलेले गाणे सोशल मीडियावर धूम करत आहे. अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव… मतानं कसा उधलून टाकलाय डाव… अशा ओळींतून आमदार रवींद्र धंगेकर यांचं गाणं कलाकारांनी तयार केले होते. आता स्वत: रवींद्र धंगेकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेरले आहे.

काय केली टीका


काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटील यांच्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील,असा टोला त्यांनी लगावला आहे. येत्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील कोल्हापूरला जातील की थांबतील हे लवकर कळेल. त्यांच्या बोलण्याचा रुबाब हा पुणेकर उतरवतील, असे त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

राज्यात ईडीचे सरकार


रवींद्र धंगेकर यांनी भाजप व शिवसेनेवर टीका केली. राज्यात ईडीचे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप सर्व्ह करतं जिंकत असलं तरचं निवडणुका जिंकू शकत नाही. पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लागली तर महाविकास आघाडीच विजयी होईल, असा दावा आमदार धंगेकर यांनी केला. लोकसभेची जागा कोण लढवावी, हा निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील, असे त्यांनी म्हटले.

बैठकीत संतापले होते आमदार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे शहरातील विविध विकासकामांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. पुणे शहर विकासकामांच्या बैठकीत समान पाणीपुरवठा, मेट्रो, जायका असे विषय होते. महापालिकेत भाजपचे गणेश बिडकर हे सभागृह नेते असताना त्यांच्या 2017 ते 2022 या काळात काही निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीला गणेश बिडकर यांनाही बोलवण्यात आले होते. मात्र, त्यांना पाहून कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर हे संतापले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील प्रश्नांसंदर्भात बैठकीसाठी शहरातील आमदारांना निमंत्रित केले होते. या बैठकीला चार आमदार उपस्थित होते. पण, निमंत्रित नसलेले भाजपचे कार्यकर्तेच या बैठकीत चर्चा करत होते. त्यामुळे ही बैठक प्रशासनाची होती की भाजपची, असा प्रश्न पडल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.