Video : पुण्यात दोन जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाला सशर्त जामीन, अटी बघा काय?

Pune Vedant Agarval Accident Case : पुण्यातील बड्या उद्योजकाचा मुलगा वेदांत अग्रवाल याने शनिवारी रात्री भरधाव वेगाने कार चालवत तरूण-तरूणींचा जीव घेतला होता. या अपघात प्रकरणात त्याला सशर्त जामीन मंजुर झाला आहे.

Video : पुण्यात दोन जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाला सशर्त जामीन, अटी बघा काय?
Pune Vedant Agarval Accident Case
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 11:06 PM

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघातामधील आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याला जामीन मंजुर झाला आहे. बड्या उद्योजकाच मुलगा असलेला वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा  घडलेला अपघात इतका भीषण होता की जागीच दोघांचा मृत्यू झाला. ज्या अटींवर त्याला जामीन दिला आहे त्या अटींमध्ये 15 दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबलसोबत वाहतूक नियंत्रण करावं लागणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील कोरेगाव पार्क येथून टू-व्हीलवर जाणाऱ्या एका कपलला स्पोर्ट्स कारने जोरात धडक दिली. ह धडक इतकी जोरात होती की तरूणी गाडीवरून 10 फूट हवेत उडाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चावणाऱ्या तरूणाने उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. दोघेही राजस्थानचे असून अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या अटींवर जामीन मंजुर

वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत. वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार या अटींवर जामीन मंजुर करण्यात आला आहे.

या अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्पोर्ट्स कार तब्बल 200 च्या स्पीडने असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं सांगितलं. अपघातामधील दोघांच्या मृत्यूनंतर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंढव्यातील Cosie बार विरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केलं आहे. रात्री याच बारमध्ये पार्टी करून त्या अल्पवयीन मुलाच्या कारने धडक तरुण-तरुणीच्या दुचाकीला धडक दिली होती. या बारमधून अल्पवयीन मुलांना दारू विक्री होत असल्याचा भाजप युवा मोर्चाने आरोप केला आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.