VIDEO | हाती झाडू घेत अपघातातील काचेचा खच साफ, पुण्यातील महिला कॉन्स्टेबलला नेटिझन्सचा सॅल्यूट
पुण्यातील महिला कॉन्स्टेबल रजिया फैयाज सय्यद अपघातानंतर रस्ता साफ करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Pune Traffic Constable cleans road)
पुणे : ऑन ड्युटी असणारी पुण्यातील महिला कॉन्स्टेबल रस्त्यावर झाडू मारत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून राज्यभरातून महिला पोलिसाचं कौतुक केलं जात आहे. बाईक आणि रिक्षाच्या अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या काचांचा खच रजिया फैयाज सय्यद यांनी झाडू मारुन साफ केला. (Pune Lady Traffic Constable cleans glass on road after accident)
एस. पी. कॉलेज चौकात अपघात
महिला कॉन्स्टेबल रजिया फैयाज सय्यद पुण्यातील खडक वाहतूक विभागात कार्यरत आहेत. पुणे शहरातील नेहमीच गजबजलेल्या एस. पी कॉलेज चौकात रिक्षा आणि दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु दुचाकी अणि रिक्षा यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले.
आधी वाहतूक सुरळीत, मग साफसफाई
वाहतुकीने गजबलेल्या पुण्यातील भर चौकात रस्त्यावर काचांचा खच साचला होता. याच वेळी सय्यद तिथे ड्युटीवर होत्या. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी सर्वप्रथम वाहतूक सुरळीत करुन दिली. दुसरीकडे, रस्त्यावर साचलेल्या काचांमुळे दुसरा मोठा अपघात घडण्याची भीती होती. रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यालाही काचा लागून दुखापत होण्याची भीती होती.
रजिया फैयाज सय्यद कौतुकाच्या धनी
जबाबदारीच्या भावनेतून रजिया फैयाज सय्यद यांनी शेजारीच असलेल्या दुकानातून झाडू आणला. रस्ता साफ करण्यासाठी त्या कोणासाठी थांबल्या नाहीत, तर स्वतःच हातात झाडू घेऊन त्यांनी रस्त्यावरच्या काचा बाजूला केल्या. (Pune Lady Traffic Constable cleans glass on road after accident)
सय्यद यांच्या प्रसंगावधानामुळे अनेक संभाव्य अपघात रोखले गेले. त्यामुळे चौकातील ये-जा करणारा प्रत्येक जण त्यांच्याकडे आदराने पाहत होता. तसंच सोशल मीडियावरही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या :
रस्त्यावर पिझ्झाचा बॉक्स फेकणे पडले महागात; 80 किलोमीटर मागे जाऊन कचरा उचलण्याची वेळ
माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय
(Pune Lady Traffic Constable cleans glass on road after accident)