Pune Lockdown Latest News : पुण्यात रात्रीची संचारबंदी, शाळा 31 मार्चपर्यंत बंद, काय सुरु, काय बंद?
पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Pune Night Curfew Lockdown Latest Update)
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Pune Night Curfew Lockdown Latest Update)
पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. मात्र कडक निर्बंध घालण्यात येणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.
तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे सौरभ राव म्हणाले.
पुण्यात काय सुरु, काय बंद?
?पुण्यात लॉकडाऊन नाही ?पुणे शहरात रात्रीची संचारबंदी ?पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू ?लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी ?31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ?हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार ?उद्यान एकवेळ बंद राहणार
पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत होते. या बैठकीदरम्यान पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला गेला. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.
विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे.
पुण्यात कोरोनाची स्थिती काय?
पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. तीन ते चार महिने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून हा आकडा दररोज वाढतो आहे अर्थात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. (Pune Night Curfew Lockdown Latest Update)
संबंधित बातम्या :
Pune Lockdown Latest News : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार