Pune Lockdown Update : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु
पुण्यातील लॉकडाऊनमध्ये उद्यापासून मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येतेय. उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहे
पुणे : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता काहीशी ओसरताना पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांत पुण्यातील रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. अशावेळी पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पुणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न होताय. पुण्यातील लॉकडाऊनमध्ये उद्यापासून मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येतेय. उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहे. तसंच सरकारी कार्यालयेही 25 टक्के उपस्थितीत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. (What will start from tomorrow in Pune, what will be closed?)
पुण्यात उद्यापासून काय सुरु राहणार?
1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार 2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु राहणार 3. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक 14 एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील. 4. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील 5. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. 6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. 7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.
पुण्यात काय बंद असणार?
1. पुण्यातील उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार 2. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार. 3. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही
उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी !
पुणे मनपा हद्दीतील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु करण्यास परवानगी दिली असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. PMPML, हॉटेल्स, उद्याने, जिम आदी आस्थापना बंदच राहतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 31, 2021
महापौरांचं पुणेकरांना आवाहन
पुणे शहरात उद्यापासून निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना काळजी घेण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. अशावेळी बाहेर वावरताना प्रचंड काळजी घ्या. स्वतः सुरक्षित राहा, कुटूंबालाही ठेवा, असं मोहोळ यांनी म्हटलंय.
पुणेकरांनो, माझी कळकळीची विनंती…
पुणे शहरात आपण बहुतांशी निर्बंध शिथिल केलेले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, पण ते तुम्हा सर्वांच्या साथीशिवाय शक्य नाही. बाहेर वावरताना प्रचंड काळजी घ्या. स्वतः सुरक्षित राहा, कुटूंबालाही ठेवा !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 31, 2021
संबंधित बातम्या :
मुलीच्या मांडव टहाळीतील डान्स महागात, भाजप आमदार महेश लांडगेंसह 60 जणांवर गुन्हा
सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, मग केंद्राची परवानगी का नाही? काँग्रेसचा सवाल
What will start from tomorrow in Pune, what will be closed?