मम्मा, बघत आहेस ना…; सिंधुताई सपकाळ यांच्या लेकीची भावनिक पोस्ट

Mamata Sindhutai Sapkal Post About Shivjayanti in Ashram : सिंधुताई सपकाळ गेल्यानंतर आश्रमातील काम कसं चालतं?; सण उत्सव कसे साजरे होतात? काल झालेली शिवजयंती कशी साजरी झाली? जाणून घेण्यासाठी माईंच्या लेकीची पोस्ट वाचा... ममता सिंधुताई यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय? वाचा...

मम्मा, बघत आहेस ना...; सिंधुताई सपकाळ यांच्या लेकीची भावनिक पोस्ट
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 3:48 PM

पुणे | 20 फेब्रुवारी 2024 : सिंधुताई सपकाळ… अनाथांची माय… ज्याचं कुणी नाही, त्याची माई आहे, असं समीकरण सर्वत्र रूढ झालं. माईंनी अनाथांना मायेची सावली दिली अन् महाराष्ट्रतील लोकही माईंच्या पाठीशी उभे राहिले. पण 4 जानेवारी 2022 हा दिवस माईंच्या लेकरांसाठी दु:खाचा डोंगर घेऊन आला. 4 जानेवारीला माईंनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर माईंची मुलं दु:खाच्या सागरात बुडाली अन् अवघा महाराष्ट्र हळहळला. माई गेल्यानंतर त्यांची लेक ममता सिंधुताई यांनी हा सगळा डोलारा आपल्या खांद्यावर घेतला अन् या चिमुकल्यांवर मोठ्या बहिणीप्रमाणे माया केली.

माईंना जाऊन आता 2 वर्षे झाली आहेत. आता माईंच्या आश्रमातील काम कसं चालतं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर ममता सिंधुताई यांनी लिहिलेल्या पोस्टमधून मिळेल. काल आश्रमात शिवजयंती साजरी झाली. यावर ममता यांनी भावनिक पोस्ट शेअर केलीय. शिवजयंतीचे फोटो ममता यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेत. मम्मा.. बघते आहेस ना…, असं ममता म्हणाल्या आहेत.

ममता सिंधुताई यांची पोस्ट जशीच्या तशी

खरतर आम्ही सगळ्यांनी आधीच ठरवलं होतं की यावेळी स्टाफपैकी कुणी काहीही न करता “शिवजयंती” ची सगळी जबाबदारी मुलांकडेच द्यायची आणि यावेळी कार्यक्रमाच नियोजन फक्त मुलांनीच करायचं. मुलांसमोर हा विचार मांडल्यानंतर मुलं अगदी आनंदाने तयार झाली आणि तयारीला लागली सुद्धा.

काहीही नाही करायचं म्हटलं तरी आम्ही सगळेच मुलांच्या तयारीवर आम्ही नजर ठेवून होतोच पण मुलांनी मात्र “गरज पडू शकते” ही शक्यता ठेवलीच नाही.

काल दिवसभर गडबड सुरू होती. झेंडे पताका फुगे सगळं आणून ठेवलं गेलं. उत्सव कमिटी मध्ये असलेल्या मुलांनी आपापली जबाबदारी वाटून घेतली असल्याने आज सकाळपासूनच कामामधली संपूर्ण सुसूत्रता दिसून येत होती. आणि एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यात आधी शिवगर्जना केली ती आमच्या माधवने. छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा करावी आणि अचानक देहातलं लाल रंग भगव्या रंगात रूपांतरित होऊन अंगावर सरसरून काटा यावा असाच क्षण होता तो.

नंतर पाठोपाठ सुरू झाली ती कार्यक्रमाची मालिकाच. मग त्यात नृत्य, भाषण,गाणे, पोवाडा, भारुड एकामागोमाग सादर होत गेले आणि आम्ही सगळेच भान हरपून फक्त बघत राहिलो. सलग एक तास खंड न पडता डोळे भरून येत होते.. वाहुन जात होते. हे एवढं सगळं यांनी कधी ठरवलं.. तयारी कधी केली.. हा आत्मविश्वास कुठून आला.. काही कळत नव्हतं पण आम्ही ठरवलं तर आम्ही काही करू शकतो हे आमच्या या छोट्या मावळ्यांनी आज दाखवून दिलं.

माझ्यासाठी म्हणाल तर हे एखाद्या पूर्ण होणाऱ्या स्वप्नासारखं होत आणि त्यासाठी मला वेदिका तुझे खूप खूप आभार मानायला हवेत. तिला सोबत करणारे सगळे हात आज अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत यात शंका नाही. दिनेश आणि प्रतिभा तुम्ही दोघेही आता या संस्थेचा अविभाज्य भाग आहात. कार्यक्रमाला तुमची आजची उपस्थिती मुलांचा उत्साह वाढवणारी होती.

प्रताप, सागर, बालाजी, विद्या, श्वेता,कल्पना, राजू भाऊ, सुरेश भाऊ, रवी, यशोदा, नलिनी, शीतल, सुरेखा ताई, गोविंदा खरंच कुणकुणाची नावं घ्यावी कळत नाहीये. मनीषा आणि दिनेशने व्यक्त केलेल्या मनोगतात एक एक शब्द जणू माझाच होता याबाबत दुमत नाही. सीमा, आज मुलांचं कौतुक करायचं म्हटलं तरी आपले शब्द संपले होते आणि यासाठी आपण आता स्पेशल वेगळा प्रोग्रॅम घेणार आहोत हे नक्की.!..

( आणि हो.. एक सांगायचं राहिलंच. शिवजयंती दिवशी जेवणाचा मेनू महाराष्ट्रीयन मेनू अगदी पिठलं भाकरी ठेचा हाच हवा ही मुलांची फर्माईश पण आज पुरी केली. त्यातही पिठलं ताईनेच बनवावं हा आवर्जून केलेला हट्ट ही. 😊)

मम्मा.. बघते आहेस ना.!..

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.