Sidhu Moosewala : संतोष जाधव.. पुण्याचा गँगस्टर ते हॉटेलचा वेटर! मोबाईल रिचार्ज करण्याइतकेही नव्हते पैसै

Santosh Jadhav Manchar News : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचं कळल्यानंतर संतोष जाधवला एका छोट्याशा हॉटेलमधून जेवणं दिलं जात होतं.

Sidhu Moosewala : संतोष जाधव.. पुण्याचा गँगस्टर ते हॉटेलचा वेटर! मोबाईल रिचार्ज करण्याइतकेही नव्हते पैसै
गँगस्टर ते वेटर...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 9:38 AM

सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose wala News) हत्येनंतर त्याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं. दोघांना अटक करण्यात आली. तर एक फरार होता. याच फरार गुंडाचं नाव संतोष जाधव (Gangster Santosh Jadhav). गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या संतोष जाधवच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या. गुजरातमधून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आता संतोष जाधवची चर्चा देशभर सुरु आहे. कुख्यात गुंड संतोष जाधवची ओळख पुण्याचा गँगस्टरपासून (Pune Crime News) सुरु होऊन एका हॉटेलचा वेटर, इथपर्यंत पोहोचल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. अटक करण्यात आल्यानंतर संतोष जाधवची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. या चौकशीतून संतोष जाधव कुठे राहिला, त्यानं काय काय केलं, त्याला काय काय भोगावं लागलं?, त्याने आणखी कोणकोणते गुन्हे केले, या सगळ्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासे होऊ लागलेत.

संतोष जाधवला कुठून अटक?

संतोष जाधव याला गुजरातमधून पअटक करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अटक केली होती. गुजरातमधील मांडवी तालुक्यामध्ये असलेल्या नागोर गावातून संतोष जाधव याला अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलीस, पंजाब पोलीस आणि हरयाणा पोलीस संतोष जाधवची चौकशी केली जातेय.

गँगस्टर ते वेटर

गँगस्टर म्हटला की डोळ्यासमोर येतो तो भाईगिरी करणारा, दरारा असणारा गुंड. हातात, गळ्यात जाडजुड चैन, बोटांमध्ये अंगठ्या, महागडे गॉगल, मोबाईल, गाड्या, शिवाय ऑर्डर सोडल्या सोडल्या ऐकतील अशी गावगुंडांची गँग सोबत ठेवणारा, असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण हे चित्र संतोष जाधवच्या बाबतील अगदी उलट झालं होतं.

हे सुद्धा वाचा

गुजरातमध्ये दबा धरुन बसलेल्या पुण्याचा गँगस्टर संतोष जाधव एका हॉटेलात वेटरचं काम करत होता. कुणालाही शंका येऊ नये म्हणून त्यानं जगण्यासाठी चक्क एका अत्यंत सामान्य हॉटेलात काम सुरु केलं होतं. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असल्यामुळे नाईलाजाने त्याला हे काम करावं लागत होतं. इतकंच काय तर मोबाईलचा साधा रिचार्ज करण्याइतकेही पैसे त्याकडे नव्हते. हॉटेलमध्ये पडेल ते काम करायचं आणि हॉटेल बॉयप्रमाणे झोपायचं, अशी संतोष जाधवची अवस्था झाली होती. कुणीतरी त्याला मोबाईल रिचार्ज करुन द्यायचं.

बिष्णोई गँगमध्ये आश्रय

ओंकार बाणखेलेचा खून केल्यानंतर संतोष जाधव फरार झाला. तो देशभर फटकत राहिला. अटकेच्या भीतीने लपत राहिला. अखेर त्याला लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने सहारा दिला. पण तिथेही त्याची फरफट सुरुच राहिली. बिष्णोई गँगच्या सांगण्यावरुन संतोष जाधवने दरोडे घालणं, जबरी चोऱ्या करणं, असे गुन्हे सुरुच ठेवले होते. पण त्याचं सगळं आयुष्यच उधारीवर सुरु होतं.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचं कळल्यानंतर संतोष जाधवला एका छोट्याशा हॉटेलमधून जेवणं दिलं जात होतं. त्यातही दोन्ही वेळेला त्याला दोन वेगवेगळ्या हॉटेलातील जेवणावर अवलंबून राहावं लागलं होतं. सकाळी एका तर रात्री दुसऱ्या हॉटेलात त्याला जेवणं दिलं जायचं. संतोष जाधवप्रमाणे बिष्णोई गँगमधील अनेक गावगुंडांचा वापर करुन त्यांना कचरा फेकल्यासारखं फेकून दिलं जात होतं, हे देखील पोलिसांच्या तपासात समोर आलंय.

हत्येनंतर खंडणी मागण्याचा धंदा

ओंकार बाणखेले खून प्रकरणार फरार असलेल्या संतोषला बिष्णोई गँगने आश्रय दिला. त्यानंतर संतोष जाधवने पैसे मिळवण्यासाठी खंडणी मागून व्यावसायिकांना धमकावण्याचा प्रकारही केला होता. जुन्नर तालुक्याती एका व्यावसायिकाला धमकावण्याचा प्रकार अटकेच्या पाच सहा महिने आधीच संतोषने केला होता.

व्हॉट्सअप कॉल करुन जुन्नरमधील एका व्यावसायिकाला संतोष जाधवने खंडणी मागितली होती. पन्नास हजार रुपयांची खंडणी मागताना संतोषनं व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमीकी दिली होती. त्यानंतर 24 मे रोजी पुन्हा एकदा त्यानं फोन करुन व्यावसायिकाला धमकावलं होतं. पण व्यावसायिकानं घाबरुन पोलिसांना याबाबत कळवलं नाही. अखेर संतोष जाधवच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर हा व्यावसायिक समोर आला आणि त्यानंतर जुन्नरच्या नारायणगाव पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.