सीरम इन्स्टिट्यूटकडून लस खरेदीची परवानगी मिळवण्यासाठी पुण्याचे महापौर दिल्ली दौऱ्यावर
सीरमकडून लस खरेदीची परवानगी देण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार.
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी पुणे महापालिकेनं सीरम इन्स्टिट्यूटकडे लस देण्याची मागणी केली आहे. सीरमकडूनही पुणे महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. मात्र, पुणे महापालिकेला लसीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, तशी माहिती महापौरांकडून देण्यात आली आहे. (Pune Mayor Murlidhar Mohol will meet central health minister Dr. Harshwardhan)
सीरमकडून लस खरदेची परवानगी मिळावी यासाठी पुण्याचे महापौर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून भेटीसाठी बुधवारची वेळ देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यासाठी तयार आहे. मात्र त्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून महापालिकेला लस घरेदीची परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पाठपुराव्यानंतही परवानगी नाही
सीरम इन्स्टिट्यूटकडून सराकात्मक पत्र प्राप्त झाल्यानंतर पुणे महापालिकेनं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीच्या खरेदीची परवानगी मिळावी अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका दोन दिवसांत जागतिक निविदा काढणार असल्याची माहितीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती. पण अद्याप केंद्राकडून लस खरेदीची परवानगी मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महापौर थेट दिल्लीला जाणार आहेत.
काँग्रेसचा भाजपवर आरोप
सीरमकडूनही पुणे महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पुणे महापालिकेला लस मिळू शकणार नाही. अशावेळी केंद्र सरकारची परवानगी का मिळत नाही? असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केलाय. इतकंच नाही तर पुणे भाजपमध्ये दोन गट पडल्याचा आरोपही मोहन जोशी यांनी केलाय.
पुणे भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. एक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा. तर दुसरा खासदार गिरीश बापट यांचा असल्याचा दावा मोहन जोशींनी केलाय. त्यामुळेच गिरीश बापट दिल्ली दरबारी प्रयत्न करत नसल्याची टीकाही त्यांनी केलीय. तर दिल्लीत गिरीश बापटांची पत उरली नाही का? असा प्रश्न निर्माण झाल्याचा टोलाही जोशी यांनी लगावलाय. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळवण्याबाबत केंद्राची परवानगी मिळायला भाजपचा अंतर्गत कलह कारणीभूत ठरत असल्याची टीका त्यांनी केलीय. पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका, केंद्रातून परवानगी मिळवा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केलीय.
औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/p9F98n3Gi6
#Aurangabad | #Viral | #ViralVideo
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या :
Pune Mayor Murlidhar Mohol will meet central health minister Dr. Harshwardhan