पुण्यात गरीब नागरिकांना स्वस्तात घरे मिळणार, 3000 घरांसाठी लॉटरी
Pune homes | गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोनाकाळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5,657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा देण्यात आला होता. या लॉटरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
पुणे: दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील व सर्व नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोनाकाळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5,657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा देण्यात आला होता. या लॉटरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
त्यानंतर गुढीपाडव्याला पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 2500 घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. आता दिवाळीच्या मुहूर्ताव पुणे म्हाडाने पुन्हा एकदा 3000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा पुढाकार
सर्व मोठ्या बांधकाम व्यवसायिकांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करुन देणे हा उद्देश ठेऊन गेल्या एक-दीड वर्षात आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली. यामुळे हजारो लोकांना चांगल्या प्रकल्पांमध्ये हक्काची घरे मिळाली आहेत.
‘म्हाडा’ची यावर्षातली तिसरी लॉटरी
म्हाडाकडून काढण्यात येणारी ही यावर्षातली तिसरी लॉटरी असणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात 5 हजार 217 सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यामध्ये पुणे महापालिका हद्दीतली 410, पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात 1020 आणि कोल्हापूर महापालिका हद्दीतल्या 62 सदनिका होत्या.
त्यानंतर म्हाडाकडून 2 जुलैला दोन हजार 908 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात आली होती. यामध्ये पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या म्हाडाच्या 2153 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतल्या 755 सदनिका होत्या.
संबंधित बातम्या: