Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्ववादी भोंग्या’ची पुण्यातल्या प्रमुख शिलेदारालाच धास्ती, वसंत मोरे राजकीय धक्क्यात

मनसेचे (MNS) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) राजकीय धक्क्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या जाहीर स्पष्टीकरणावरून तरी असेच दिसत आहे. माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम (Muslim) मतदान जास्त आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 'हिंदुत्ववादी भोंग्या'ची पुण्यातल्या प्रमुख शिलेदारालाच धास्ती, वसंत मोरे राजकीय धक्क्यात
मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना हटवल्यानंतर फेसबूक पोस्टImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 11:13 AM

पुणे : मनसेचे (MNS) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) राजकीय धक्क्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या जाहीर स्पष्टीकरणावरून तरी असेच दिसत आहे. माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम (Muslim) मतदान जास्त आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल, असे वसंत मोरे म्हणाले आहेत. मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही. मात्र मलाच कळेना झाले आहे, मी काय भूमिका घ्यावी, असा संभ्रम वसंत मोरेंच्या बोलण्यातून दिसून आला आहे. ते पुढे म्हणालेत, की काहीही असो पण राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. रमजानचे दिवस आहेत, त्यामुळे शांतता पाळा. मी राज ठाकरे यांच्यावर नाराज नाही. पण काय भूमिका घ्यावी, हे मला कळत नाही, अशी कबुली वसंत मोरे यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले. राज यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.

राजकीय पक्षांकडून टीका

भाजपा वगळता राज ठाकरे यांच्या या वादग्रस्त भूमिकेची सर्वच स्तरातून टीका होत आहे. राज्यात बेरोजगारी, महागाई विशेषत: पेट्रोल-डिझेल दरवाढ यासह विविध प्रश्न असताना धार्मिक, संवेदनशील मुद्दे उचलून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याची टीका होत आहे. काही जणांनी तर राज ठाकरेंवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

ऐका, वसंत मोरे काय म्हणाले…

आणखी वाचा :

MNS | राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, नाराज असण्याचा प्रश्नचं नाही, साईनाथ बाबर यांनी चर्चा फेटाळल्या

Pune crime : बनावट नावे वापरून करत होते व्यापाऱ्यांची फसवणूक, वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bullock Cart Race VIDEO | वेगवान बैल जोडीसमोर मालक पडला, पायाखाली तुडवला जाणार तोच…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.