Pune MNS : पुणे एअरपोर्ट रोडवरच्या उड्डाणपुलाचा आराखडा चुकला, मनसे आक्रमक; रास्तारोको करत आराखडा बदलण्याची मागणी

विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही समस्या निर्माण झाली आहे. याच भागात काही आयटी कंपन्यादेखील आहेत. त्यामुळे या कोंडीत भरच पडली आहे. यात आता उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्याचाही आराखडा चुकला आहे.

Pune MNS : पुणे एअरपोर्ट रोडवरच्या उड्डाणपुलाचा आराखडा चुकला, मनसे आक्रमक; रास्तारोको करत आराखडा बदलण्याची मागणी
एअरपोर्ट रोडवरील उड्डाणपुलाचा आराखडा बदलण्याच्या मागणीसाठी मनसेचे आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 1:15 PM

पुणे : एअरपोर्ट रोडवरच्या (Airport road) उड्डाणपुलाचा आराखडा चुकला, याविरोधात पुण्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने आज रास्तारोको आंदोलन केले. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. जुन्या एअरपोर्ट रोडवर आता उड्डाणपूल होत आहे. उड्डाणपुलाच्या ठिकाणचा जो रस्ता आहे, तो जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकांचा जाण्या-येण्याचा रस्ता आहे. त्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. याठिकाणच्या उड्डाणपुलाचा (Flyover bridge) हा आराखडा बदलून तिथे तीन ते चार पिलर वाढवले तर ही समस्या सुटू शकते, असे मनसेचे नेते साईनाथ बाबर म्हणाले. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. हा आराखडा बदलावा, यासाठी घोषणाबाजीही मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

पोलिसांची मध्यस्थी

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एअरपोर्ट रोड हा आधीच गर्दीचा, मोठ्या रहदारीचा रस्ता आहे. याठिकाणी वाहनांची ये-जा असते. तसेच व्हीआयपींची वाहनेदेखील या रस्त्याने येत असतात. त्यातच हे आंदोलन करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. एका बाजूला वाहनांच्या रांगा होत्या. तर दुसऱ्या बाजूला मनसे कार्यकर्ते घोषणाबाजी करत रास्तारोको करत होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना उठवून रस्ता मोकळा केला.

हे सुद्धा वाचा

साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात मनसेचे आंदोलन

कधी होणार वाहतूककोंडीतून सुटका?

मागील काही काळापासून विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही समस्या निर्माण झाली आहे. याच भागात काही आयटी कंपन्यादेखील आहेत. त्यामुळे या कोंडीत भरच पडली आहे. यात आता उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्याचाही आराखडा चुकला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या मनस्तापात आणखी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन रहदारीच्या रस्त्यावर चुकीचा उड्डाणपूल होत असून त्यात बदल करण्याची मनसेची मागणी आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.