PMC election 2022 : पुणे महापालिकेची ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गजांचा पत्ता कट? वाचा सविस्तर…

महापालिकेच्या 58 पैकी जवळपास सात असे प्रभाग आहेत, जे पूर्णत: आरक्षित आहेत. त्यामुळे त्याठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी नसणार आहे. याचा फटका खुल्या गटात आणि त्यातही पुरूष उमेदवारांना बसला आहे.

PMC election 2022 : पुणे महापालिकेची ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गजांचा पत्ता कट? वाचा सविस्तर...
पुणे महानगरपालिकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 4:31 PM

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी (PMC election 2022) ओबीसी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात एकून 58 प्रभाग आहेत. या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडत आज पार पडली. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोडतीमध्ये एकूण 87 जागांसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune commissioner Vikram Kumar) यांच्या उपस्थितीत हा सोडतीचा कार्यक्रम पार पडला. या सोडतीमध्ये महापालिकेतील सर्वपक्षीय बहुतांश नेत्यांना दिलासा मिळाला आहे. बहुतेक नेत्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या प्रभागांमधून त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. मात्र शनिवार पेठेतील प्राभाग 17मध्ये भाजपाच्या (BJP) अनेक इच्छुकांची गर्दी असताना या प्रभागात तीनपैकी एक जागा सर्वसाधारण असेल, एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी असेल तर एक जागा मागासवर्गीय महिलेसाठी असणार आहे.

ओबीसींसाठी किती?

पुणे महापालिकेच्या 173 पैकी 46 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षणामुळे भाजपाला मात्र धक्का बसला आहे. कारण यात भाजपाच्याच माजी नगरसेवकांचे प्रमाण अधिक आहे. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे त्यांच्याऐवजी घरातील महिलेला त्यांना संधी द्यावी लागणार आहे किंवा आपली प्रतिष्ठा पणाला लावून इतर कोणत्यातरी प्रभागात उमेदवारी मिळवावी लागणार आहे. अनेकांचा पत्ता या आरक्षणामुळे कट झाला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील दीपक पोटे, प्रभाग क्रमांक 17 मधील हेमंत रासने अशा काही नगरसेवकांची अडचण या सोडतीनंतर होणार असल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

खुल्या गटाची स्थिती काय?

महापालिकेच्या 58 पैकी जवळपास सात असे प्रभाग आहेत, जे पूर्णत: आरक्षित आहेत. त्यामुळे त्याठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी नसणार आहे. याचा फटका खुल्या गटात आणि त्यातही पुरूष उमेदवारांना बसला आहे. प्रभाग क्रमांक तीन लोहगाव-विमान नगर, प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क-मुंढवा, प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत-दत्तवाडी, प्रभाग क्रमांक 39 मार्केटयार्ड-महर्षी नगर, प्रभाग क्रमांक 42 रामटेकडी-सय्यद नगर, प्रभाग क्रमांक 46 मोहम्मद वाडी-उरळी देवाची तसेच प्रभाग क्रमांक 47 कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागांचा यात समावेश आहे.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...