पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Mod) पुण्यात (Pune) उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेचा मार्ग मोकळा झालाय. 7 हजार कोटींचा हा नदीसुधार योजनेचा प्रकल्प पर्यावरण वाद्यांचे आक्षेपामुळे थांबला होता. या प्रकल्पाविरोधात असणारी याचिका फेटाळण्यात आलीय. यामुळे हा प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात असणारे सर्व अडथळे दूर झाले आहे. भाजप नेते व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्टिट करून ही माहिती दिली आहे. या प्रकल्पात 6 हजार झाडं तोडली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून विरोध करण्यात येत होता.
नदीकाठ सुधार प्रकल्पाविरोधातील याचिका ‘एनजीटी’पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळल्याने या प्रकल्पाला आता निश्चितच गती येईल.
हे सुद्धा वाचापर्यावरणाच्या अनुषंघाने सर्वांगीण विचार करुनच आपण हा प्रकल्प अंतिम केला होता, त्यावर आता न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने निश्चितच समाधान आहे. हा…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 4, 2023
एनजीटीने फेटाळली याचिका
पुणे महापालिकेकडून मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.परंतु या प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केला असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी संस्थांकडून करण्यात येत होता. या प्रकल्पात 6 हजार झाडं तोडली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत होता त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली होती. नोव्हेंबर २०२२मध्ये एनजीटीने त्यांची याचिका फेटाळली होती.
सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील
एनजीटीनंही ही याचिका फेटाळून लावली होती आता सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली आहे. याचिका रद्द करताना आराखड्यामध्ये काही बदल करायचे झाल्यास या बदलांना पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी, असे बंधन घातले होते. सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केल्याचे ट्विट माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. पर्यावरणाच्या अनुषंघाने सर्वांगीण विचार करुनच आपण हा प्रकल्प अंतिम केला होता, त्यावर आता न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने निश्चितच समाधान आहे. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार करण्याचाच निश्चित प्रयत्न असेल, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेय.
2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे.पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मुळा, मुठा आणि मुळा-मुठा या 44 कि. मी. लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.
प्रकल्पाचा काय होता उद्देश