लग्न झाल्यापासून बायकोनेही माझा हात ओढला नाही, तेवढ्यांदा…;अजित पवार काय म्हणाले?
Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : अजित पवार सध्या 'जनसन्मान यात्रा' करत आहेत. अजित पवारांची ही यात्रा आज पुण्यात आहे. या यात्रेत अजित पवारांनी उपस्थित भगिनींना संबोधित केलं तेव्हा त्यांनी मिश्किल टिपण्णी केली. अजित पवारांचं हे विधान सध्या चर्चेत आहे. वाचा सविस्तर...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘जनसन्मान यात्रा’ सध्या सुरु आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेबाबत या दौऱ्या दरम्यान अजित पवार बोलताना दिसतात. ‘जनसन्मान यात्रा’ आज पुण्यात आहे. या यात्रेला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे. अजित पवारांच्या हातात हात देण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गर्दी होत आहे. या यात्रेदरम्यान अजित पवारांसोबत या भगिनी रक्षाबंधन सण साजरा करत आहेत. जुन्नर तालुक्यातही महिलांनी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली आहे.
अजित पवारांचं विधान काय?
रक्षाबंधन कार्यक्रमात आलेल्या महिलानी माझा हात धरला, ओढला… खरं तर माझं लग्न झाल्यापासून बायकोनेही इतक्यादा माझा हात कधी ओढला नाही. तेवढ्यांदा या महिलांनी हात ओढला. पण हे सगळं बहिणीच्या नात्याने घडलं, असं अजित पवार म्हणाले. आज इथं रक्षाबंधन करताना इतक्या मोठ्या प्रमाणत महिला आलेल्या आहेत. राखी बांधताना मी विचारले की माऊली पैसे आले का तर त्या बोलल्या आल्या. मात्र काहींना अजून आले नाही. पण ते येतील आम्ही शब्दाचे पक्के आहेत, असंही अजित पवारांनी म्हटलं.
लाडकी बहिण योजनेवर अजित पवार काय म्हणाले?
माझा जन्म काटेवाडीत झाला. नंतर आम्ही बारामतीमध्ये राहत होतो. आमच्या घरी गरीब महिला कामानिमित्त यायच्या. शेतात सुद्धा महिला काम करण्यासाठी यायच्या. महिलांना आवडीची गोष्ट घेता येत नाही. ती स्वतःच्या आवडीला मूरड घालते. अडीच कोटी नाही चा सर्व केला आणि ही योजना आम्ही सुरू केली. आम्ही थोडे थोडे पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. इतकी चांगली योजना आणली तर विरोधक न्यायालयात गेलेत. आम्ही आता दिलं आणि पुढेही देणार आहोत. 45 हजार कोटी वाटप करणार आहे इतके पैसे बाजारपेठेत येणार आहे, असं अजित पवार नारायणगावमध्ये बोलताना म्हणाले.
आम्हीच पुन्हा सरकारमध्ये येऊ आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत राज्याला आर्थिक अडचणी आणणार नाही. मी आर्थिक शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आम्ही व्यवस्थित पणे ही योजना पुढे चालू ठेवू. मुलींना आई-वडील गरीब असल्यावर शिक्षण घेता येत नाही. आता त्या गरीब घरातल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च हे पूर्णपणे राज्य सरकार करणार आहे. कॉलेजच्या फी आम्ही भरणार आता त्या मुलीने तिला डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं हे तिने ठरवावं… सरकार मुलींच्या शिक्षणासाठी सरकार काम करत आहे, असं अजित पवार म्हणाले.