पुणे : नाशिकहून थेट पुण्याला (Nashik- Pune) सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) लवकरच जाता येणार आहे. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्याला प्राथमिक मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प सुरु होणार आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेमी हायस्पीडचा हा प्रकल्प ब्रॉडगेजवर असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation) म्हणजेच महारेलकडून हा प्रकल्प करण्यात येणार आहे.
वेग ताशी 200 किलोमीटर
पुणे-नाशिक दरम्यान सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे पुण्याहून नाशिकला रेल्वे मार्गाने जाण्यासाठी कल्याण व कल्याणवरुन पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नाशिक गाठावे लागते. यात सुमारे पाच ते सहा तास जातात. परंतु आता पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणार आहे. 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे. नाशिक, नगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. हा प्रकल्प ब्रॉडगेजवर चालवल्यास शेतकरी आणि उद्योगांना मोठा फायदा होईल.
कसा आहे प्रकल्प?
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत पुर्ण करता येणार आहे. ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. दरम्यान, या रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
कसा होणार खर्च?