पुण्यात नवले पुलावर टँकरने 47 वाहनांना उडवले, ब्रेक निकामी भीषण अपघात

| Updated on: Nov 20, 2022 | 10:06 PM

ब्रेक निकामी झाल्याने पुण्यातील नवले पुलावर एका भरधाव टँकरने 47 वाहनांना उडवले आहे. भरधाव टँकरने अनेक गाड्यांना उडवले असल्याने अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

पुण्यात नवले पुलावर टँकरने 47 वाहनांना उडवले, ब्रेक निकामी भीषण अपघात
Follow us on

पुणेः पुण्यातील नवले ब्रिजवर आज पुन्हा एकदा भरधाव टँकरने 30 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे. टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवरील 30 वाहनांना जोरदार धडक बसली आहे. टँकरने अनेक वाहनांना धडक दिली असल्यान अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.
नवले पुलावर याआधीही अनेक वेळा भीषण अपघात झाले आहेत.

ज्या ज्यावेळी अपघात झाले आहेत,त्यावेळी प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करुनही यावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे या पुलावर वारंवार अपघात होत आहेत.

आजही भीषण अपघात झाला असून यामध्ये अजून किती लोक जखमी आहेत त्याची माहिती अजून उपलब्ध होऊ शकली नाही. सायंकाळी या पुलावर प्रचंड गर्दी असते.

या गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अजून तरी जखमींचा आकडा समजला नाही. मात्र अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना नवले रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

या घटनेची माहिती समजताचा घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी करण्यात आली. यावेळी अपघातात जखमींना नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे.