Pune NCP : पेट्रोल के दाम कम हुए की नहीं हुए? भोंग्यांवर मोंदीचं भाषण; राष्ट्रवादीचं पुण्यात ‘भोंगा आंदोलन’

देशात महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. या सर्वांवरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार योगी आदित्यनाथ, राज ठाकरेंसारख्यांना पुढे करत आहे. विषय भलतीकडेच नेण्याचा खटाटोप केंद्र सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

Pune NCP : पेट्रोल के दाम कम हुए की नहीं हुए? भोंग्यांवर मोंदीचं भाषण; राष्ट्रवादीचं पुण्यात 'भोंगा आंदोलन'
गुडलक चौकात राष्ट्रवादीनं केलं भोंगा आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:51 AM

पुणे : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुण्यात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीने भोंगा आंदोलन केले. केंद्र सरकारने वाढवलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोंगा आंदोलन (Bhonga aandolan)करण्यात आले आहे. येथील गुडलक चौकात राष्ट्रवादीने भोंगा आंदोलन केले. वेगवेगळ्या प्रकारचे भोंगे यावेळी राष्ट्रवादीतर्फे लावण्यात आले. या भोंग्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषणही राष्ट्रवादीने लावल्याचे पाहायला मिळाले. पेट्रोल (Petrol) के दाम कम हुए की नहीं हुए? असे मोदी बोलत असल्याचे हे भाषण आपल्याला ऐकायला मिळते. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही, उलट विषय दुसरीकडेच नेऊन राजकारण सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

‘लक्ष हटविण्याचा खटाटोप’

देशात महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. जनता एकीकडे हैराण झाली आहे. तर या सर्वांवरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार योगी आदित्यनाथ, राज ठाकरेंसारख्यांना पुढे करत आहे. विषय भलतीकडेच नेण्याचा खटाटोप केंद्र सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. भोंगे काढा भोंगे लावा सांगत जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. आम्हाला विकासाचा भोंगा हवा आहे, असे ते म्हणाले.

‘भोंगे तेच मात्र…’

ज्या भोंग्यांवरून मोदी, योगी, राज ठाकरे राजकारण करत आहेत, त्याच भोंग्यांच्या माध्यमातून आम्ही मोदींची जुनी भाषणे ऐकवत आहोत. इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या हातात फलक दिसत होते तर घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

आणखी वाचा :

पोलीस भवनाच्या कार्यक्रम पत्रिकेत अनिल देशमुखांचं नाव! देशमुख तुरुंगात, मग नाव कशासाठी? चर्चा तर होणारच!

Navneet Rana : राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी! जेल, बेल की जेलमध्येच घरचं जेवण? आज ठरणार

Pune Hapus : हापूस आला टप्प्यात..! पुण्याच्या मार्केटयार्डात आवक वाढली; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दरही कमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.