महायुतीत रस्साखेच, राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट?; ‘या’ मतदारसंघातील उमेदवारीवरून वाद

NCP Ajit Pawar Group Controversy : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात वाद सुरु झाला आहे. विधानसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार गटात वाद सुरु आहे. पुण्यातील मतदारसंघात हा वाद झाला आहे. पुण्यात नेमकं काय झालंय? वाचा सविस्तर....

महायुतीत रस्साखेच, राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट?; 'या' मतदारसंघातील उमेदवारीवरून वाद
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 11:18 AM

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. काहीच दिवसात आचारसंहिता लागेल आणि निवडणूक प्रक्रिया पार पडेल. अशातच आता महायुतीतील वाद समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. पुण्यातील मावळ विधानसभेच्या जागेवरून वाद सुरु आहे. महायुतीतील या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडणार असल्याचं बोललं जात आहे. मावळचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. तर याच जागेवर भाजपने देखील दावा केला आहे.

कोणत्या मतदारसंघात रस्सखेच?

पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून वाद सुरु आहे. महायुतीतून उमेदवारी मिळावी, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते इच्छुक आहेत. मावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बापूसाहेब भेगडे इच्छुक आहेत. महायुतीमधील घटक पक्ष भाजपने मावळ विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. मात्र भाजपने दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्येच या जागेबाबत कलगीतुरा रंगू लागला आहे.

अजित पवारांकडे उमेदवारीची मागणी

मावळ विधानसभेच्या जागेवरती अजित पवार गटातीलच प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी देखील दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मावळ विधानसभेची उमेदवारीची मागणी केली असल्याचं बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे सध्या मावळ विधानसभेच्या जागेवरती केवळ भाजपच नव्हे तर अजित पवार गटामध्ये देखील चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे.

मावळचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. असं असताना या मतदारसंघावर भाजपने देखील दावा केला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीतच्या जागावाटपात ही जागा कुणाकडे जाणार? अजित पवारांकडे ही जागा आल्यास ते कुणाला उमेदवारी देणार? हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.