पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला टोळक्याची बेदम मारहाण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला बाहेर बोलवून मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. नातेवाईकाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात कुटुंबीयांसोबत आल्यानंतर कोंढव्यातील नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांना बाहेर बोलवून तीन ते चार जणांनी जबर मारहाण करत कमरेला हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास रेसकोर्सजवळील टर्फ क्लबच्या समोर घडला. याप्रकरणी पठाण यांनी […]

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला टोळक्याची बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला बाहेर बोलवून मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. नातेवाईकाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात कुटुंबीयांसोबत आल्यानंतर कोंढव्यातील नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांना बाहेर बोलवून तीन ते चार जणांनी जबर मारहाण करत कमरेला हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास रेसकोर्सजवळील टर्फ क्लबच्या समोर घडला.

याप्रकरणी पठाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सल्लाउद्दीन, लियाकत, मैनुद्दीन सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल गफूर पठाण हे कोंढव्यातील नगरसेवक आहेत. ते मंगळवारी रात्री त्यांच्या कुटुंबीयांसोबत रेस कोर्स येथील टर्फ क्लबमध्ये नातेवाईकाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला.

‘हमको पहचानते नही क्या’, असे म्हणत त्यांना अरेरावीची भाषा केली. त्यानंतर त्यांना बाहेर येण्यास सांगितलं. ते बाहेर आल्यांतर चौघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर कमरेला हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली. चौघेही त्यांच्या तोंडओळखीचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.