Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune NCP : एवढाच भोंग्यांचा त्रास होतोय तर स्वत:ची सभा भोंग्यांशिवाय करावी; पुणे राष्ट्रवादीच्या हलिमा शेख यांचं राज ठाकरेंना आव्हान

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला जाऊ नये, असे आवाहन हलिमा शेख यांनी जनतेला केले आहे. सभेत किंवा सभेनंतर अनुचित प्रकार घडला तर याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्याक विभाग राज्यभर तीव्र मोर्चा काढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Pune NCP : एवढाच भोंग्यांचा त्रास होतोय तर स्वत:ची सभा भोंग्यांशिवाय करावी; पुणे राष्ट्रवादीच्या हलिमा शेख यांचं राज ठाकरेंना आव्हान
मुंबईहून पुणे, औरंगाबादकडे रवाना होताना राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 1:32 PM

पुणे : भोंगे, स्पीकर यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांना त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून भोंगे, स्पीकरशिवाय सभा करावी. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जबाबदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल, अशी टीका राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश संघटक सचिव हलिमा शेख यांनी केली आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली असली, तरी अटी व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी. जर सभेत किंवा सभेनंतर अनुचित प्रकार घडला तर याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्याक विभाग राज्यभर तीव्र मोर्चा काढेल, असा इशारा हलिमा शेख (Halima Shaikh) यांनी दिला आहे.

‘सभेला जाऊ नये’

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला जाऊ नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अटीशर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. तशी माहिती औरंगाबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अटीशर्थींमध्ये कुणावर वैयक्तिक टीका न करणे, तसंच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी बाळगणे या महत्त्वाच्या अटींचा समावेश आहे. मात्र तरीदेखील अशा वादग्रस्त नेत्यांच्या सभांना जाऊ नये, असे आवाहनही राष्ट्रवादीने केले आहे.

राष्ट्रवादीचे आंदोलन

भोंग्यांच्या विषयावरून एकीकडे राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. यासर्व राजकारणाचा विरोध म्हणून राष्ट्रवादीने आज पुण्याच्या गुडलक चौकात भोंगा आंदोलन केले. वेगवेगळ्या प्रकारचे भोंगे यावेळी राष्ट्रवादीतर्फे लावण्यात आले. या भोंग्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषणही राष्ट्रवादीने लावल्याचे पाहायला मिळाले. भोंगे काढा, भोंगे लावा सांगत जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. आम्हाला विकासाचा भोंगा हवा आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...