सुप्रिया सुळे यांची बारामतीमध्ये झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यावर सडकून टीका; म्हणाल्या…
MP Supriya Sule on namo maharojgar melava baramati 2024 : सुप्रिया सुळे यांचा बारामता लोकसभा मतदारसंघाचा दौरा; नमो महारोजगार मेळाव्यावर टीका. भोरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? आगामी लोकसभा निवडणुकीवर काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
विनय जगताप, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, भोर- पुणे | 03 मार्च 2024 : बारामतीमध्या काल नमो महारोजगार मेळावा पार पडला. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. नोकरी म्हणलं की आपल्यात अप्रँटशिप किंवा ट्रेनी म्हणतं नाहीत. त्यांनी आधी सांगितलं 43 हजार नोकऱ्या आहेत. मग म्हणाले 30 हजार नोकऱ्या आहेत. मग नंतर म्हणाले त्या 30 हजार पैकी 15 हजार या ट्रेनीसाठीच्या नोकऱ्या आहेत. आणि आता उर्वरित कायं आहेत हे नक्की माहिती नाहीत, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली.
रोजगार मेळाल्यावर टीका
लोकसभा निवडणूक आली की हे मोठे मोठे मेळावे घेतात आणि ह्याला खर्च केंद्र सरकार करतं. या सगळ्या मधून जाहिरात कुणाची होतीय? तर यांच्या महायुतीची यामध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर हा सातत्याने यांची जाहिरात करण्यासाठी होत आहे. हे मोठं दुर्दैव आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भोर तालुक्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकी दरम्यान सुप्रिया सुळे यांनी नमो महारोजगार मेळाव्यावर टीका केली.
नमो रोजगार मेळाव्यासाठीच्या पेंडॉलचा एक दिवसाचा खर्च हा 1 कोटी आहे. सरकारने शासन आपल्या दारी किंवा अशा प्रकारच्या मेळाव्यावर खर्च करण्यापेक्षा या खर्चातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली असती तर त्यांचे आशीर्वाद मिळाले असते, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांची बारामतीमध्ये झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यावर सडकून टीका केलीय.
अजित पवार गटाच्या टीकेला उत्तर
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून होत असलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांचं अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय. तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं. माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई कुठय ते…सोशल मीडियावर दिसतंय आपली आई कुठल्या गावात भाषण करतीय? कारण ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विरोधकांना उत्तर
हमारी सबसे बडी ताकद, हमारी इमानदारी है…. आमचे विरोधकही म्हणतात, आमचे मनभेद नाहीत आमचे मतभेद आहेत. हे दुर्दैव आहे की इतकं दूषित राजकारण आज झालंय. अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यासह अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून टीका होत असते. त्यावर सुळे यांनी भोर मधील महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बोलताना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय.