Pradeep Deshmukh : गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विषारी कीड; राष्ट्रवादीच्या प्रदीप देशमुखांची पुण्यात टीका, म्हणाले…

जास्तीत जास्त अश्लाघ्य कसे बोलता येईल आणि स्वतः पहिल्यांदा बोललेले रेकॉर्ड पुढच्यावेळी अजून घाणेरडे बोलून कसे मोडता येईल, असा या व्यक्तीचा प्रयत्न असतो, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केली आहे.

Pradeep Deshmukh : गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विषारी कीड; राष्ट्रवादीच्या प्रदीप देशमुखांची पुण्यात टीका, म्हणाले...
प्रदीप देशमुख/गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:41 AM

पुणे : गोपीचंद पडळकर ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विषारी कीड आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी आणि विशेषत: पवार कुटुंबीयांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका करतात. यावरून राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाली असून प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मागील काही दिवसांत कांद्याचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असो की अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्यासंबंधीचा वाद या विषयांवरून गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) शरद पवारांना लक्ष्य केले होते. तर पवारांवर टीका करताना अनेकवेळा त्यांचा तोल जात असल्याचे दिसून येते. यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर जशासतसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला आहे.

काय म्हणाले प्रदीप देशमुख?

गोपीचंद पडळकर ही राज्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. जास्तीत जास्त अश्लाघ्य कसे बोलता येईल आणि स्वतः पहिल्यांदा बोललेले रेकॉर्ड पुढच्यावेळी अजून घाणेरडे बोलून कसे मोडता येईल, असा या व्यक्तीचा प्रयत्न असतो. संघाचे आणि भाजपाचे म्हणवणारे हे आमदार कोणत्याही राजकीय, सामाजिक प्रश्नावर न लढता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जास्तीतजास्त कसे अश्लाघ्य बोलता येईल, याची वारंवार प्रॅक्सिसच करत असतात. अशा प्रकारांची वक्तव्य करून हे भाजपाची आणि स्वतःची लायकी दाखवत असतात. शरद पवारांसारख्या सूर्यावर थुंकल्याने ती थुंकी आपल्या तोंडावर पडेल, हे का पडळकरसारख्यांना कळत नाही, असा सवाल करत तुमची अश्लाघ्य बडबड बंद करा, ही बडबड थांबली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जसास तसे उत्तर देईल, असा इशारा देखमुख यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

अलिकडेच गोपीचंद पडळकर यांनी कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये शरद पवारांवर टीका केली होती. नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या ###वर लाथ घाला, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील. त्यानंतर त्यांना कांद्याचा वास द्या, ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का, असा सवाल करून पडळकर यांनी वाद ओढवून घेतला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.