संगिता वानखेडेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप; रोहित पवारांचं केवळ 3 ओळीत उत्तर

NCP MLA Rohit Pawar on Sangita Wankhede Statement About Sharad Pawar : युगेंद्र पवार राजकारणात एन्ट्री करणार? युगेंद्र पवार हे शरद पवार गटात येत असतील तर आमदार रोहित पवार यांची काय भूमिका आहे? रोहित पवार नेमकं काय म्हणाले? संगिता वानखेडे यांच्या टीकेला काय उत्तर दिलं? वाचा...

संगिता वानखेडेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप; रोहित पवारांचं केवळ 3 ओळीत उत्तर
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 4:02 PM

अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 22 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकारी संगिता वानखेडे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं.त्या कोण आहेत? याचा अभ्यास करावा लागेल. यांचं नाव देखील मी ऐकलेलं नाही. योग्य व्यक्तीने टीका केली तर मी त्यावर बोलतो, असं रोहित पवार म्हणाले.

युगेंद्र पवार राजकारणात येणार?

अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. युगेंद्रने साहेबाना पाठिंबा दिला ही चांगलीच गोष्ट आहे. अजित दादांवर अन्याय झालेला नाही. पवार कुटुंबांसाठी शरद पवार साहेबांनी खूप कष्ट केले. सर्व कुटुंब पवार साहेबांसोबत आहे.

अजित पवार एकटे पडलेत?; रोहित पवार म्हणाले…

कुटुंबाला तुम्ही सोडलं आणि एकटे पडलात तुमच्या निर्णयामुळे एकटे पडला आहात. अवती भवती असणारे नेते कधी रिस्क घेणार नाहीत. हे कधीच लोकांमध्ये जाऊन निवडून येणार नाहीत. हे अजितदादांच्या कानात जाऊन सुनेत्रा वहिनींना उभं करण्यासाठी सांगत आहेत. हे लोक दादांचं नुकसान करत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.

पुण्यात सापडलेल्या ड्रग्जवरून फडणवीसांवर निशाणा

एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलं. एकतर आपले गृहमंत्री 100 टक्के जबाबदार आहेत. तुमच्या काळात पकडलं पण उत्पादन सुरू कधी झालं किती विकल गेलं ते सांगा. इथलं सगळं गुजरातला आणि ड्रग्स फॅक्टरी इथं… राज्यात बिहार आणि उत्तर प्रदेश पेक्षा जास्त गुन्हेगारी वाढली आहे. पालकमंत्री साहेबांनी पुण्याच्या गुन्हेगारीत लक्ष घालावं. अजित पवारसाहेबांसोबत काम करत असताना गुंड दादांच्या शंभर मीटर पेक्षा लांब राहायचे. ते आता फोटो काढतात. आता पुण्यात गुंड दिसतात. नेत्यांची मुलं गुंडांना भेटायला येतात. लोकसभा आणि विधानभा निवडणुकीत गुंडचा वापर करू अस हे लोक सांगत आहेत, असं म्हणत राज्यात सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.