तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार रस्त्यावर; लैंगिक अत्याचारांच्या घटनांविरोधात मविआचं ‘निषेध आंदोलन’

Pune NCP Sharad Pawar Group Protest : पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार रस्त्यावर उतरले आहेत. लैंगिक अत्याचारांच्या घटनांविरोधात मविआचं निषेध आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे प्रत्येक अपडेट्स, वाचा सविस्तर...

तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार रस्त्यावर; लैंगिक अत्याचारांच्या घटनांविरोधात मविआचं 'निषेध आंदोलन'
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 10:54 AM

महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ सुरु आहे. तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ‘निषेध आंदोलन’ केलं जात आहे.

पुण्यात महाविकास आघाडीचं ‘मूक आंदोलन’

पुण्यात आज महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाले आहेत. तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन केलं जात आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं जात आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आवडतं ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन लावण्यात आलं आहे. शांततेच्या मार्गाने महाविकास आघाडी महिला अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदवत आहे.

सकाळी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक तास हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. काळ्या फिती बांधत हे आंदोलन केलं जात आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे.

महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडी मैदानात

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी आंदोलन करत आहे. पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. आहे. तर ठाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.