Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी
पुणे महापालिकेत 23 गावांचा (Pune new 23 villages) समावेश करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
पुणे: पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा (Pune new 23 villages) महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदेशानं जारी करण्यात आला आहे. पुणे महापालिका हद्दवाढ करण्याचा अध्यादेश नगरविकास विभागाकडून काढण्यात आला आहे. पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली आहे. अध्यादेशामुळं 23 गावं पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Pune new 23 villages included in PMC Ordinance Passed by Maharashtra Government)
ती 23 गावे कोणती?
- खडकवासला
- किरकटवाडी
- कोंढवे धावडे
- मांजरी बुद्रूक
- नांदेड
- न्यू कोपरे
- नऱ्हे
- पिसोळी
- शेवाळवाडी
- काळेवाडी
- वडाची वाडी
- बावधन बुद्रूक
- वाघोली
- मांगडेवाडी
- भिलारेवाडी
- गुजर निंबाळकरवाडी
- जांभूळवाडी
- होळकरवाडी
- औताडे हांडेवाडी
- सणसनगर
- नांदोशी
- सूस
- म्हाळुंगे
उच्च न्यायालयाच्या आदेशानं यापूर्वी 11 गावांचा समावेश
पुणे महापालिकेच्या हद्दीतील 34 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानंतर युती सरकारच्या काळात 11 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यातही आली. उर्वरित गावंही टप्प्याटप्प्यानं महापालिकेत घेण्यात येतील असं शपथपत्रही देण्यात आलं होतं. त्यानंतर ही गावं महापालिकेत घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला, असल्याची माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातच 9 हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, असं महापालिकेकडून सांगण्यात आले होते. (Pune new 23 villages included in PMC Ordinance Passed by Maharashtra Government)
नव्या निर्णयावर पालिकेची भूमिका काय?
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांच्या विकारासाठी 9 हजार कोटी रुपयांची गरज लागणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेनं राज्य सरकारकडे 9 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान, युती सरकारच्या काळात पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावातील विकासकामं अद्याप प्रलंबित आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट होणारी 23 गावं विकासापासून वंचित राहू नयेत, यासाठी महापालिकेला राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ही गावं टप्प्याटप्प्यानं समाविष्ट करावीत, अशी भूमिका पुणे माहापालिकेनं घेतली होती.
पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय
पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय https://t.co/gSIGUJKQZO @AjitPawarSpeaks @mieknathshinde @mohol_murlidhar @InfoDivPune #pune #PMC
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
संबंधित बातम्या:
पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय
पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी 6695 कोटींचा प्रकल्प, राज्य सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरु
(Pune new 23 villages included in PMC Ordinance Passed by Maharashtra Government)