Pune News : PMPML च्या पुणे शहरात दहा मार्गांवर नवीन बससेवा सुरू, सध्याच्या चार मार्गांचाही विस्तार

पीएमपीएमएलने पुणे शहरात शुक्रवारपासून दहा नवीन मार्ग सुरू केले आहेत. तर काही मार्गांचा विस्तार केला आहे. यात येवलेवाडीहून पुणे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांना दोन बस बदलाव्या लागत होत्या, मात्र आता मार्ग विस्तार झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

Pune News : PMPML च्या पुणे शहरात दहा मार्गांवर नवीन बससेवा सुरू, सध्याच्या चार मार्गांचाही विस्तार
pmpml busesImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 6:34 PM

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड ( पीएमपीएमएल ) (PMPML) नवीन दहा मार्गांवर बस सेवा सुरू केली आहे. तसेच चार मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य प्रवासी नव्या मार्गांवर बस सेवा सुरू करण्याची मागणी करीत होते. त्यामुळे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी या नव्या मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवड सेक्टरमधील सध्याच्या चार मार्गांचा विस्तार केला आहे.

पुण्यात असे अनेक रस्ते आणि मार्ग आहेत जिथे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) च्या बसेस पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत अनेकांना चालताना त्रास सहन करावा लागतो. या मार्गांवर बसेस चालविण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. अशा परिस्थितीत शहरातील कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पीएमपीएमएलने गुरुवारी 10 नवीन मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच ३ फेब्रुवारीपासून पीएमपीएमएलने पुण्यातील 10 नवीन मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवड सेक्टरमधील सध्याच्या चार मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएमपीएमएल बसेस या नवीन मार्गांवर धावतील

उरुळी कांचन ते नांदूरगाव, गुजरात कॉलनी ते पुणे रेल्वे स्टेशन, आळंदी ते खराडी, येवलेवाडी ते पुणे रेल्वे स्टेशन, हडपसर ते पुणे रेल्वे स्टेशन, शेववाडी ते एनटी वाडी डेपो, आळंदी ते तळेगाव डेपो, घरकुल आहेत. याशिवाय वसाहत ते पिंपरी गाव, भोसरी ते चिखली, आणि भोसरी ते कोथरूड आगारासाठीही नवीन बससेवा सुरू होणार आहे. आतापर्यंत या मार्गांवर पीएमपीएमएल बससेवा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत होते.

या मार्गांचा विस्तार

पुणे परिवहन मंडळाने हडपसर-थेऊर रस्ता वाघोली, भारती विद्यापीठ-स्वारगेट ते शनिवारवाडा, राजस सोसायटी-स्वारगेट ते शिवाजीनगर आणि निगडी-नवलख उंब्रे ते ग्रीन बेस कंपनीपर्यंत मार्ग विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी येवलेवाडीहून पुणे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांना दोन बस बदलाव्या लागत होत्या, मात्र आता मार्गाचा विस्तार झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांचा प्रवासही सुकर होणार आहे. इतर मार्गांवरही अशीच सुविधा उपलब्ध होणार आहे

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.